अविनाश सावंत यांना नियुक्तीपत्र देताना आ.सुनील तटकरे व मान्यवर.
औंध:-कोकराळे येथील युवा नेते अविनाश कालिदास सावंत यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साहित्य कला व सांस्कृतिक विभागाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी भवन मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात आ.सुनील तटकरे यांच्या हस्ते व या विभागाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांच्या उपस्थितीत अविनाश सावंत यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
निवडीनंतर अविनाश सावंत म्हणाले की खा.पवार साहेबांच्या धोरणानुसार व या पदाच्या माध्यमातून जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी व तळागाळातील लोकांपर्यंत विचार पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. या निवडीबद्दल त्यांचे आ.शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे,युवक उपाध्यक्ष गणेश सावंत, विक्रमशेठ शिंदे,योगीराज रणनवरे,सागर सावंत,विनायक गायकवाड, अमित गायकवाड आदींसह मान्यवरांनी अभिनंदन केले.

0 Comments