Hot Posts

6/recent/ticker-posts

मलकापूरला नगरपंचायत प्रशासनाकडून शिवाजीनगर रस्ता खुला


मलकापूर
येथील शिवाजीनगर मध्ये पुर्वी शिवाजी चौक ते श्री. बापुराव शिवराम फुके यांच्या घरापर्यंतच रस्ता रहदारीस येणे जाणेसाठी होता. सदर रस्त्यावर मुळचे घर असलेने रस्ता पुर्णपणे बंद असलेने लोकांना येणे जाणे साठी खुप अडचणी येत होत्या. 

येथील लोकांनी २० ते २५ वर्षापासून अर्ज , निवदने तोंडी व लेखी मागणी केली होती पण पुर्वी ग्रामपंचायत असलेने त्यावर कायदेशीर अडचणी निर्माण होत होत्या. कालांतराने ग्रामपंचायत ची नगरपंचायत झाली आणि सदर रस्त्याची मागणी जोर धरू लागली त्यावर नगरपंचायत प्रशासनाने व सभाग्रहाने प्रयत्न चालू केले चर्चा व बैठक घेऊन वर्षभरात योग्य ती मदत व आश्वासन देऊन सर्व कायदेशीर सोपस्कार पुर्ण करून आज रविवारी २६.११.२०१७ सकाळी ११.०० ला घर बाजूला काढून रस्ता नागरिकांसाठी रस्ता खुला करणेत आला.  या कामासाठी प्रयत्न करणारे सर्व नागरिक , स्थानिक शिवाजीनगरचे प्रभाग क्रं.०४ नगरसेवक श्री.गजेंद्र बुधावले (भाऊ) , नगरपंचायत प्रशासन आणि उपनगराध्यक्ष श्री.मनोहर शिंदे  यांचे मोलाचे योगदान व सहकार्य मिळाले असल्याचे नागरिकांनी सांगितले 

Post a Comment

0 Comments