Hot Posts

6/recent/ticker-posts

येरळवाडी तलावाच्या आवर्तन साठी चितळीच्या ग्रामस्थांनी केला रास्तारोको


मायणी :-
येरळवाडी तलावात मुबलक पाणी शिल्लक असतानाही चितळी ता खटाव या गावातील शेती साठी पाण्याचे आवर्तन निवेदन देऊनही अद्याप सोडले नसल्याने चितळी गावच्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र बाहेर काढून मल्हारपेठ पंढरपूर हा राजमार्ग रोखून रास्ता रोको केला .
        यावेळी असंख्य शेतकऱ्यांनी गुंडेवाडी (मराठानगर),चितळी फाट्यावर रस्त्यावर बसून येणारी वाहतूक रोखून धरली. यावेळी पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करीत उपस्थित आंदोलन कर्त्याना वाहतूक जाऊन देण्याची विनंती केली . पोलिसांच्या विनंतीला मान देऊन ग्रामस्थांनी काही वेळा नंतर वाहतूक  जाऊ दिली परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूस ग्रामस्थ आपले ठाण मांडून बसले होते . या वेळी प्रशासनाकडून शाखा अभियंता श्री गायकवाड यांनी निवेदन स्वीकारले .
    
याबाबत चितळी गावचे सरपंच संतोष पवार यांनी यावेळी असे म्हंटले की ' चितळी गावाच्या हद्दीत मोहितेनगर व पवारमळा या दोन्ही ठिकाणच्या परिसरात शेतीसाठी येरळवाडी तलावातून डावा व उजवा कॅनॉल द्वारे पाणी येत असते . सध्या या भागातील शेती पाण्याअभावी करपू लागली असून येथे पाण्यानी नितांत गरज आहे . यासंदर्भात आम्ही १३ ऑक्टोम्बर रोजी वडूज पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय येथे तर १४रोजी पालकमंत्री श्री शिवतारे ,सातारा पोलीस स्टेशन,पाणी पुरवठा ऑफिस सातारा  ,पाटबंधारे विभागांना  '२५ ऑक्टोम्बर पर्यंत पाणी सोडण्यात यावे अन्यथा २६ तारखेला चितळी येथे रास्ता रोको करण्यात येईल ' अशा विषयीचे निवेदन देण्यात आले होते . परंतु २५ तारखे पर्यंत प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने आज आम्ही रास्ता रोको केला आहे .
         उपस्थितांनी शाखा अभियंता गायकवाड यांना निवेदन दिले ,त्यावेळी सातारा जिल्हा कार्यालयाचे  श्री दाभाडे यांच्याशी फोनवरून संपर्क केल्यानंतर ३ ते ४ दिवसात पाणी सोडण्यात येईल असे त्यांनी सांगितले .
     यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही . मायणी दुरक्षेत्राचे सपोनि संतोष गोसावी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .

Post a Comment

0 Comments