Hot Posts

6/recent/ticker-posts

पाटण पंचायत समितीत प्रधानमंत्री आवासदिन कार्यक्रम


पाटण/संजय कांबळे 
पाटण पंचायत समितीच्या वतीने २० नोव्हेंबर रोजी प्रधानमंत्री आवास दिना अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना,शबरी आवास योजना या योजनांच्या लाभार्थी मेळावा व उत्कृष्ट घरकुल बांधकाम केलेल्या लाभार्थी यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. तसेच या योजनेमध्ये पाटण पंचायत समितीच्या उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.

 कार्यक्रमास सभापती उज्ज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार, गटविकास अधिकारी संजीव गायकवाड, सहा.गटविकास अधिकारी जयवंत वाघ, जि.प.सदस्य बापू जाधव, पंचायत समिती सदस्य बबन कांबळे, विस्तार अधिकारी सागर बोलके, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता जगदीशसिंह पाटणकर, घरकुल विभाग अधिकारी पांडुरंग उथळे उपस्थित होते.

पंचायत समिती पाटण यांचे वतीने पाटण तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०१६\१७ मध्ये ६४२ घरकुले मंजूर होती. एकूण ३८० लाभार्थ्यांनी घरकुल बांधून पूर्ण केली आहेत. तसेच रमाई आवास योजनेत २२२ घरकुले मंजूर करण्यात आली त्यापैकी २२१ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वर्ग करण्यात आला असून त्यापैकी १०० लाभार्थ्यांनी घरकुले बांधून पूर्ण केली आहेत,  शबरी आवास योजनेत ३ घरकुले बांधून पूर्ण करण्यास आली आहेत.

सदर कार्यक्रमात लाभार्थीनी आपले मनोगते व्यक्त केली. यावेळी  उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी मार्गदर्शन केले, तर आभार सतिश माने यांनी मांडले.

Post a Comment

0 Comments