Hot Posts

6/recent/ticker-posts

पाटण मुळगाव रस्त्यावर ओढ्यामध्ये घाणीचे साम्राज्य


त्रिपुडी/ वार्ताहर 
पाटण येथून  मुळगाव रोड ला जात असताना जवळच एक ओढा आहे. त्या ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घाण साठली आहे.

ओढ्यामध्ये कचराच कचरा टाकलेला आढळतो. त्या कचऱ्यामुळे तेथील रहिवासी व तेथुन जाणाऱ्या लोकांना मोठया प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.  घाणीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. तरी  तो कचरा लवकरात लवकर काडुन ओढा रिक्त करण्यात यावा जेणेकरून त्या कचऱ्यामुळे दुर्गँधि वास येणार नाही व तेथील वातावरण चांगले राहील याकडे पाटण नगरपंचायतिने लक्ष देणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments