Hot Posts

6/recent/ticker-posts

उध्दव ठाकरे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पश्‍चिम महाराष्ट्र दौऱ्यावर


शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी कर्जमाफीसह इतर प्रश्‍नांवर संवाद साधणार आहेत. 
ठाकरे यांचे विदर्भ, मराठवाड्यात शेतकरी संवाद दौरे झाले. आता पश्‍चिम महाराष्ट्रात नोव्हेंबरअखेर दौरा होणार आहे. या दौऱ्याच्या नियोजनासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व्यस्त झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या संभाव्य दौऱ्यात 24 नोव्हेंबरला कोल्हापूर, 25 नोव्हेंबरला सांगली तर 26 नोव्हेंबरला साताऱ्यात शेतकरी संवाद कार्यक्रम होईल. साताऱ्यातील दौऱ्यात त्यांची कऱ्हाड येथे जाहीर सभा व शेतकरी संवादाचा कार्यक्रमाचे नियोजन आहे.

Post a Comment

0 Comments