Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्षपदी तेजस शिंदे


सातारा - राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावर आमदार शशिकांत शिंदे यांचे ज्येष्ठ चिरंजीव तेजस शिंदे यांनी बाजी मारली. जिल्हाध्यक्षपदाच्या रेसमध्ये वाईचे ऍड. विजयसिंह पिसाळ,बाळू खंदारे, राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचा जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे, गजेंद्र मुसळे, तसेच कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांचे पुत्र तेजस शिंदे यांची नावे अंतिम टप्प्यात होती.
साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे यांनी आपल्याला हे पद मिळावे, अशी आग्रही मागणी केली होती. दरम्यानच्या काळात नियोजन समितीची निवडणूक लागल्याने राष्ट्रवादीने खंदारे यांना नगरपालिका मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांची युवकची जिल्हाध्यक्ष होण्याची मागणी मागे पडली. त्यानंतर ऍड. विजयसिंह पिसाळ यांचेच नाव निश्‍चित होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी तेजस यांचे नाव जिल्हाध्यक्षपदासाठी निश्‍चित केले. 

Post a Comment

0 Comments