Ticker

6/recent/ticker-posts

मायणीत १५ रोजी कर्करोग व रक्तक्षयवर मोफत आरोग्य शिबिर


मायणी:-(विजय झोडगे)
मायणी व मायणी परिसरातील नागरिकांसाठी बुधवार दि.१५ रोजी येथिल ग्रामदैवत श्री.सिध्दनाथ मंदिरामध्ये मुख कर्करोग (अोरल कँन्सर)व रक्तक्षय (अँनेमिया)रोगावर मार्फत मार्गदर्शन व्याख्यान आयोजित केले आहे.

यामध्ये रोगाची लक्षणे,घ्यावयाची काळजी तसेच आधुनिक उपचार पद्धती अधिविषयावर मोफत महात्मा गांधी हॉस्पिटल मिरजच्या डाँ.दिप्ती पाटील यांचे मुख कर्करोग (कोरल कॅन्सर ) तर होमिअोपँथी तज्ञ डॉ. विजय पाटील यांचे रक्तक्षय (अँनेमिया)या विषयावर मार्फत मार्गदर्शन व्याख्यान आयोजीत केले आहे.

  यावेळी डॉ. सयाजी पवार, डॉ. शशिकांत कुंभार, डॉ.महेश साळुंखे,डॉ.राजेंद्र माने,डॉ. विकास देशमुख,डॉ.मकरंद तोरो,
सिद्धीविनायक डेंटल क्लिनिकचे डाँ.अमोद चोथे, श्रेयस हॉस्पिटलचे सुर्याकांत कुंभार , मायणी मेडिकल असोसिएशन व  फ्रेंड्स ग्रुप बहुउद्देशीय  विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे आरोग्य शिबीर संपन्न  होणार आहे.

Post a Comment

0 Comments