Hot Posts

6/recent/ticker-posts

लोणंद ला २५ रोजी भव्य रक्तदान शिबीर


लोणंद/ सत्य सह्याद्री वृत्त सेवा 
राष्ट्रीय छात्र सेना / एनसीसी (नॅशनल कॅडेट कोर) स्थापना दिनानिमित्त मालोजीराजे ज्युनियर कॉलेज लोणंद व लोणंद फाउंडेशन, लोणंद यांच्या वतीने दि. २५ शनिवारी लोणंद येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

या शिबिराचे उद्घाटन लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. सोमनाथजी लांडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली रयत शिक्षण संस्थेचे जनरलबाॅडी सदस्य मा. हरिभाऊ माने व रयत शिक्षण संस्थेचे सल्लागार समितीचे सदस्य मा. आनंदराव शेळके पाटील या मान्यवरांच्या हस्ते तसेच शरदचंद्रजी पवार महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. नितीन सावंत,
शरदचंद्रजी पवार महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य नगरसेवक मा. हणमंतराव शेळके पाटील,लोणंद मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष मा. डॉ. किशोर बुटीयाणी सर, लोणंद फाउंडेशन चे अध्यक्ष मा. दयानंदभाऊ खरात, मुख्य मार्गदर्शक व सातारा जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य मा. शशिकांत जाधव (बापू)  लोणंद फाउंडेशन,लोणंद चे उपाध्यक्ष डॉ. स्वाती शहा मॅडम, मालोजीराजे विद्यालय लोणंद चे मुख्याध्यापक मा. प्रा. के. एम. देठे सर, लेफ्टिनेंट मा. एन. एस. लवटे सर, लोणंद फाउंडेशन, लोणंद चे कायदेशीर सल्लागार अॅड. विलायतभाई उर्फ बबलूभाई मणेर साहेब, लोणंद शहर इंजीनियर असोसिएशन चे अध्यक्ष मा.गजेंद्र मुसळे ,लोणंद फाउंडेशन, लोणंद चे सचिव मा. कय्युमभाई मुल्ला, मार्गदर्शक महंमदभाई कच्छी, चंद्रकांतदादा जगताप, राजुभाई कुरेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. 
तरी सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे. 
दिनांक :- २५ नोव्हेंबर २०१७, 
वार :- शनिवार ,
वेळ:-सकाळी १०:०० वाजता,
ठिकाण:- मालोजीराजे विद्यालय, ज्युनियर कॉलेज लोणंद.

Post a Comment

0 Comments