Hot Posts

6/recent/ticker-posts

दुर्ग संमेलनात शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करा. _पाटण तालुका शिवसेनेची मागणी_

याच फोटो वर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे 


पाटण /प्रतिनिधी 
पाटण तालुक्यातील दातेगड ( सुंदरगड) या ठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्राच्या ४ थ्या दुर्ग संमेलनात महाराष्ट्राचे आराध्य दैवत  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व प्रतिमेस हार न घालता  अवमान केला असून सबंधित लोकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने सातारा जिल्हा उपप्रमुख  जयवंतराव शेलारव पाटण तालुका प्रमुख रवींद्र पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की पाटण तालुक्यातील टोळेवाडी या गावच्या लगत असलेल्या दातेगड(सुंदरगड) येथे महाराष्ट्राचे ४ थे दुर्गसंमेलन नुकतेच संपन्न झाले, तत्पूर्वी संयोजकांच्या वतीने येथील गडाच्या पायथ्याशी असलेल्या टोळेवाडी गावातील प्रवेशद्वारावर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत  छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व पुतळ्याचे पुजन करण्यात आले, त्या कार्यक्रमाचा फोटो सोशल मिडिया वर फेसबुक व्हाटसअप वर फिरत आहे , परंतु त्या फोटो मधे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व प्रतिमेस अगोदर पुष्पहार न घालता संयोजक व उपस्थित मान्यवर स्वतच गळ्यात हार व पायात चप्पला घालून शिवरायांच्या पुतळ्यासमोर उभे राहिले आहेत असे दिसत आहे, या कृत्याने शिवछत्रपतींचा घोर अपमान व अवमान केला आहे. या घटनेमुळे  मुळे तमाम शिवप्रेमी व शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून संतापाची लाट उसळली आहे,


तरी या लोकांच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी  नाहीतर तालुक्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल  असे शेलार व पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे या  मागणीचे निवेदन पाटणचे तहसीलदार रामहरी भोसले व पाटण पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांना देण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments