Hot Posts

6/recent/ticker-posts

फलटण तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवड प्रक्रिया पूर्ण


विक्रम चोरमले (फलटण)
फलटण तालुक्यातील २० ग्रामपंचायतीतील उपसरपंच  निवडी दिनांक २५ रोजी बरड, चौधरवाडी, चव्हाणवाडी, गिरवी, कुरवाली खुर्द, कुसूर, मानेवाडी, मठाचीवाडी, मिरेवाडी, पाडेगाव, पिंप्रद, सालपे,सोमंथळी, सुरवडी, तरडफ, ताथवडा, वडले, वेळोशी, विडणी, झडकबाईचीवाडी या ग्रामपंचायतीची मुदत दिनांक २५ रोजी संपत असल्यामुळे नवनिर्वाचित सरपंच व सदस्य झाले त्यानंतर लगेचच दुपारी २ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले व या विशेष सभेत नवनिर्वाचित  सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली  उपसरपंच पदाच्या निवडी करण्यात आल्या  तहसील कार्यालय फलटण यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रक जाहिर केले.  

१) बरड- गोरख बबन टेंबरे - ९ विरुद्ध ४
२) चौधरवाडी - सिंधू मनॊहर गिरमे - ६ विरुद्ध ५
३) चव्हाणवाडी- चेतन चंद्रकांत चव्हाण - बिनविरोध 
४) गिरवी - वर्षा रघूनाथ जाधव - बिनविरोध 
५) कुरवाली खुर्द - विजया दिपक निंबाळकर - ५ विरुद्ध ४
६) कुसूर - दादासो बिरा नरुटे - बिनविरोध 
७) मानेवाडी - अंकुश दादा कदम - बिनविरोध 
८) मठाचीवाडी - रुपाली विक्रमसिंह भांडवलकर - बिनविरोध 
९) मिरेवाडी - वैशाली पिलोबा लकडे - बिनविरोध 
१०) पाडेगाव - रुपाली बिपीन मोहिते - बिनविरोध 
११) पिंप्रद - उमेश  वसंतराव  भगत - ६ विरुद्ध ५
१२) सालपे - मंदाकिनी सुनिल कचरे - ५ विरुद्ध ३
१३) सोमंथळी - राहुल पोकळे - ७ विरुद्ध ४
१४) सुरवडी - दिपक राजाराम साळूंखे - बिनविरोध 
१५) तरडफ - रमेश  विशाल सपकाळ - बिनविरोध 
१६) ताथवडा - राहुल महादेव जाधव - बिनविरोध 
१७) वडले - छाया विठ्ठल शेंडगे - बिनविरोध 
१८) वेळोशी - शितल दादा कांबळे - बिनविरोध   
१९) विडणी - प्रशांत ज्ञानेश्वर जाधव - १२ विरुद्ध ३
२०) झडकबाईचीवाडी- रविंद्र रामचंद्र शिंदे - बिनविरोध  
  
वरील प्रमाणे निवड प्रक्रिया शांततेत पार पडली असून  उर्वरित आदर्की बुद्रुक व आदर्की खुर्द या गावासाठी दिनांक २८ रोजी आणि दुधेबावी दिनांक ११ डिसेंबर, वाठार निबांळकर दिनांक २७ डिसेंबर रोजी चार  गावांच्या नवनिर्वाचितांचे पदग्रहण व उपसरपंच निवडी पार पडतील.

Post a Comment

0 Comments