Hot Posts

6/recent/ticker-posts

सातारा पालिका बरखास्त करून तेथे प्रशासक नेमा-भाजप नगरसेवकांची मागणी

सातारा 
 राज्यIतील भाजप सरकारने सातारा पालिकेला तब्बल १५० कोटी रुपये दिले . मात्र केवळ राजकीय श्रेयवादाच्या आकसातून सातारा विकास आघाडीने कोणताच प्रकल्प धडपणे होऊ दिला नाही त्यामुळे सातारा पालिका बरखास्त करून तेथे प्रशासक नेमावा अशी सनसनाटी मागणी पालिकेतील  भाजप च्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी भाजपचे गटनेते धनंजय जांभळे नगरसेविका सिद्धी पवार, प्राची शहाणे, विजय काटवटे अॅड प्रशांत खामकर मिलिंद काकडे  उपस्थित होते . 

भाजप नगरसेवकांच्या कार्यकाला ला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले  त्यानिमित सिद्धी पवार यांनी गटनेत्यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी संवाद साधला  त्या म्हणाल्या  सातारा पालिकेतील सातारा विकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांना भाजपच्या सहा नगरसेवकांनी गेल्या वर्षभरात आठ प्रकल्पांचे प्रस्ताव दिले . भवानी पेठेतील युनियन क्लबची जागा बेकायदेशीरपणे बळकविण्यात आली आहे . क्लबच्या पिछाडीला असणाऱ्या ४६ गुंठे जागा हरित उपक्रमा अंर्तगत बागेसाठी आरक्षित असताना तिथे राजकीय आकसातून चौपाटी पुनर्वसनाचे षडयंत्र रचले जात आहे .  गेल्या अनेक वर्षापासून पालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणारे तत्कालीन पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा थेट इशारा  भाजपच्या नगरसेविका सिध्दी पवार यांनी पत्रकार  परिषदेत दिला 

सिध्दी पवार  म्हणाल्या . राजवाड याच्या पिछाडीला भवानी पेठेतील ४६ गुंठे जागा बागेसाठी आरक्षित आहे . ही मोक्याची जागा बळकवण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला होता .  मात्र गेल्या दहा महिन्यात कागदोपत्री पाठपुराव्याने हे प्रकरण उघडकीस आले . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या पुढाकाराने  ही जागा बागा विकसित करण्यासाठी अनुकुलता दर्शवली  आहे . या प्रस्तावित उदयानाला स्व गोपीनाथ मुंढे स्मृती उदयान हे नाव देण्याचा मानस आहे . तरीसुध्दा या बगीच्याच्या जागेमध्ये चौपाटीच्या पुनर्वसनाचे षडयंत्र रचले जात आहे  सत्ताधाऱ्यांचा राजकीय आकस ही किवं आणणारा आहे . राजवाडा येथील राजीव गांधी मल्टिपर्पज हॉल सुध्दा महिला बचत गटासाठी मागण्यात आला होता. मात्र इथे खाजगी कला स भरवून त्याचे उत्पन्न एका नगरसेविकेने लाटण्याचा उद्योग सुरू ठेवला आहे . 

भवानी पेठेतील भाजी मंडईचा प्रस्तावित हॉल सुध्दा जिम हेल्थ सेंटर दयावा अशी मागणी करण्यात आली होती . मात्र सातारा विकास आघाडीने तो प्रकल्पही गुंडाळून ठेवला आहे . सातारा शहरात पोहण्याचा तलाव शहरात ठिकठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे अशी भाजप ने विकासात्मक कामे सूचवूनही त्याकडे साविआने दुर्लक्ष केल्याचा आरोप सिध्दी पवार यांनी केला  

Post a Comment

0 Comments