Hot Posts

6/recent/ticker-posts

पाटण तालुका विध्यार्थी युवा सामाजिक संघटनेमार्फत महात्मा फुले स्मृतिदिन


पाटण/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा 
पाटण तालुका विध्यार्थी युवा सामाजिक संघटनेमार्फत *महात्मा फुले स्मृतिदिन साजरा* करण्यात आला.यावेळी पाटण तालुका अध्यक्ष शुभम उबाळे व पदाधिकारी यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन आणि दिपप्रज्वलन करण्यात आले.

पाटण तालुका अध्यक्ष शुभम उबाळे यांनी महात्मा फुले यांचे  विचार मांडले. बहुजन व स्त्री शिक्षणाचे जनक म्हणुन महात्मा फुले यांना ओळखले जाते. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुणे या ठिकाणी काडली.छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती करणारे व शिवाजी  महाराजांची समाधी शोधून काढणारे ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता  महात्मा ज्योतीराव फुले यांना आपले गुरु मानले होते.महात्मा ज्योतीराव फुले हे शेतकऱ्यांचे जनक आहेत.शुभम उबाळे म्हणाले, महात्मा फुले स्मृति दिन  हाच खरा शिक्षक दिन आहे.
    
पाटण तालुका उपाध्यक्ष विकास कदम यांनी सुत्रसंचलन केले व लक्ष्मण गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.तसेच या कार्यक्रमास उपस्तीत असणारे सर्व पदाधिकारी व नितीन शिर्के,तुषार कदम अक्षय सुतार व विध्यार्थी वर्ग उपस्तीत होते.

Post a Comment

0 Comments