स्व.यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या पुर्णाकृती पुतळयास अभिवादन करताना आर.सी.बडगुजर, एच. टी. देसाई, डी. जे. जाधव आदी.
शिरवडे
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे प्रेरक आणि देशाचे माजी उपपंतप्रधान स्व.यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या 33 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त कारखाना कार्यस्थळावरील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.सी.बडगुजर यांनी स्व.यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या जीवन कार्याची महती विषद केली.
याप्रसंगी फायनान्सियल अॅडव्हायझर एच. टी. देसाई, जनरल मॅनेजर (प्रोसेस) पी. आर. यादव, प्रोसेस अॅडव्हायझर बी. एल. मांडवे, चीफ अकौन्टंट जी. व्ही. पिसाळ, सिव्हील इंजिनिअर वाय. जे. खंडागळे, सिव्हील इंजिनिअर (एक्स्पां.)उदय पाटील, डेप्यु. सिव्हील इंजिनिअर प्रताप चव्हाण, कामगार व कल्याण अधिकारी एन. आर. जाधव, जनसंपर्क अधिकारी व्ही. जे. शेलार, वाहन विभागप्रमुख व्ही. बी. क्षीरसागर, इरिगेशन इंजिनिअर डब्ल्यु.एल.साळुंखे, शेती अधिकारी मोहनराव पाटील, ई. डी. पी मॅनेजर पी. एस. सोनवणे, ऊस विकास अधिकारी व्ही. बी. चव्हाण, पर्यावरण इंजिनिअर एच. जे. माने, डिस्टीलरी इनचार्ज डी. जे. जाधव, स्टोअर सुपरीटेंडंट डी. एन. पिसाळ, डेप्यु. चीफ अकौन्टंट संजय पाटील, डेप्यु. ऊस विकास अधिकारी एस. जी. चव्हाण, सुरक्षा अधिकारी एस.बी.नाईगडे, इरिगेशन संपर्क प्रमुख आर. जी. तांबे, यांचेसह सर्व विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

0 Comments