Hot Posts

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील जन्मशताब्दीनिमित्त एक डिसेंबरपासून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धां


कराड येथे होणाऱया राज्यस्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धेच्या तयारीच्या पाहणीवेळी आ. पृथ्वीराज चव्हाण, समवेत आ. आनंदराव पाटील, सुभाषराव पाटील, झाकीर पठाण व इतर. 

व्यासपीठाचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन 

कराड
ज्येष्ठ नेते माजी आ. पी. डी. पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कराड येथील लिबर्टी मैदानावर येत्या एक डिसेंबरपासून सुरु होणाऱया खुल्या पुरुष आणि महिला राज्य कबड्डी निवड चाचणी स्पर्धा ठिकाणास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (शनिवारी) सकाळी भेट दिली. 

यावेळी आ. चव्हाण यांच्या हस्ते व्यासपीठ उभारणीचे भूमिपूजन करण्यात आले. येत्या 1 डिसेंबर ते 4 डिसेंबरअखेर या कालावधीत या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आ. चव्हाण यांनी तेथे भेट दिली. यावेळी जिल्हा काॅंग्रेसचे अध्यक्ष आ. आनंदराव पाटील, लिबर्टी मजदूर मंडळाचे अध्यक्ष व नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील, शंकराप्पा संसुद्दी, नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने, माजी नगरसेवक अॅड. मानसिंगराव पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, जिल्हा काॅंग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण, लिबर्टीचे सचिव विनायक पवार, राजेंद्र डुबल, दुर्गेश मोहिते, मंडळाचे सर्व संचालक, खेळाडू तसेच पदाधिकारी उपस्थित होते. 

सदरच्या स्पर्धांसाठी आ. चव्हाण यांनी 5 लाख रुपये व आ. आनंदराव पाटील यांनी 5 लाख रुपयांचा निधी दिला आहे. यावेळी सुभाषराव पाटील यांनी स्पर्धेच्या नियोजनाबाबतची माहिती आ. चव्हाण यांना दिली. स्पर्धेचा उदघाटन सोहळा, निमंत्रित खेळाडू व मान्यवरांच्या पाहुणचाराची सोय याबाबत माहिती विस्तृत केली. आ. चव्हाण यांनी स्पर्धांची तयारी व स्पर्धा कालावधीतील नियोजनामधील बारकावे जाणून घेतले. व त्याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments