Hot Posts

6/recent/ticker-posts

घोटील येथे आगीने घर भस्मसात

पाटण/ प्रतिनिधी
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील वरचे घोटील या गावामध्ये एका घरात  सोमवारी मध्यरात्री शाॅक सर्कीट टने लागलेल्या भीषण आगीत पूर्ण घर जळून खाक झाले आहे.
सोमवारी दिनांक २७ रोजी येथील पवार कुटुंबीयांच्या घराला मध्यरात्री १ वाजता शाॅक सर्कीट होऊन आग लागली या आगीत १० खणी तिघई घर जळून खाक झाले. या घरात पवार पवारांची ६ कुटुंबे राहत होती, दरम्यान या आगीत या कुटुंबाचे एकूण ३१ तोळे सोने, ५ लाख रूपये रक्कमेसह धान्य असे  ६ परिवाराचे एकूण २० लाख ७० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे हि  ६ कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.

Post a Comment

0 Comments