वरकुटे म्हसवड / दीपक काटकर
धुळदेवच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन आ.जयकुमार गोरे यांनी धुळदेव येथे आयोजित जाहीर सभा व नूतन सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्या सत्कार समारंभात बोलताना केले.
यावेळी आ.गोरे म्हणाले आघाडी सरकारच्या काळामध्ये माण-खटावचा वेगाने विकास झाला. माण-खटाव या दोन्ही तालुक्यात शेकडो साखळी सिमेंट बंधा-याची साखळी उभा राहीली असुन उरमोडीचे पाणी माण-खटावच्या मातीत वाहताना दिसते आहे.अनेक रस्त्यांची व इतर कामे मोठ्या प्रमाणावरती होत आहेत.माजी मुख्यमंञी पृथ्वीराज चव्हाण यांनी उरमोडी व जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेस व माण-खटावच्या विकासास भरीव निधी आघाडी सरकारच्या काळामध्ये उल्पब्ध करुन दिला.धुळदेव गावाने काँग्रेस पक्षावरती जो विश्वास दाखवल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले.
यावेळी नूतन सरपंच मारूती कोळेकर, उपसरपंच चंद्रकांत ढवळे व धुळोबा परिवर्तन पॅनेल चे सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना नूतन सरपंच मारूती कोळेकर म्हणाले, धुळदेवचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असून मला मतदान कोणी केले,कोणी केले नाही याचा विचार मी करणार नसून गावचा सरपंच या नात्याने संपूर्ण गावाला सोबत घेऊन गावाबरोबरच वाडया वस्त्याचा काया पालट करणार सर्वसदस्यांना सोबत घेऊन गावाच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहणार आहे.
यानंतर शामराव कोळेकर व जयाप्पा कोळेकर यांनी आपली मनोगते व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमास म्हसवडचे माजी नगराध्यक्ष वसंत मासाळ, नगरसेवक विकास गोंजारी, माजी नगरसेवक शिवाजी लोखंडे, अँड.दत्ताञय हांगे,लुबाळ सर, काकासाहेब माने , विलासराव देशमुख, प्रकाश कापसे, संतोष जगदाळे , अमोल माने, दुर्योधन कोळेकर , सुनिल कोळेकर, दिलिप ढवळे, तानाजी कोळेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

0 Comments