फलटण/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
वाठार निंबाळकर ता. फलटण येथे दिनांक २४ रोजी सकाळी ९:०० वाजता कीटकनाशके वापर व हाताळणी विषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात कीटकनाशके फवारणी किटचे शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात आले. मागील काही दिवसांपासून कीटकनाशक फवारणी दरम्यान शेतकऱ्यांचे झालेले मृत्यु व विषबाधा या अनुशंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कीटकनाशक फवारणी संबधी घ्यावयाची काळजी व संरक्षित किटचा वापर कसा करावा यावर शेतकरी शेतमजुरांना मार्गदर्शन करण्यात आले.
शेतक-यांनी किटकनाशकापासून सुरक्षिततेसाठी सुरक्षा किट वाटप व मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी मिरगाव, निंभोरे, वाठार निंबाळकर, वाखरी, ढवळ या भगातील शेतकरी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये बी.एस. बोडरे कृषी अधिकारी पंचायत समिती फलटण, दिपक महागंडे विस्तार अधिकारी कृषी अधिकारी पंचायत समिती फलटण, संतोष नाबर तलाठी, महादेव अढाव ग्रामसेवक, कैलाश थोरात कृषी सहायक, ग्रा.पं.सरपंच सौ.शोभादेवी निंबाळकर, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, फलटण शहर व फलटण पश्चिम तालुक्यातील कृषी सेवा केंद्र धारक,संदिप राऊत यु.पि.एल कंपनी प्रतिनिधी व शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. अशा प्रकारचे कार्यक्रम सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात विभागानुसार होणे फार गरजेचे आहे.



0 Comments