Hot Posts

6/recent/ticker-posts

भोजलिंग ट्रेकर्सनी स्वखर्चातून केला भोजलिंग रस्ता




लोकसहभागातून झालेला रस्ता 
म्हसवड (धनंजय पानसांडे)
रस्त्यावर असंख्य खड्डे, रस्त्याच्या बाजूला फूट दिड फूट साईड पट्टी खचलेली, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडा झुडपातून मागॅ काढत वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. हे आहे जांभूळणीला जाणार्या रस्त्याचे वास्तव दररोज येणार्या जाणार्या भाविक व परिसरात राहणाऱ्या नागरिक दररोज अनुभवत होते. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी अनेक वर्षांपासून होत होती परंतू या भागातील प्रतिनिधीत्व करणार्‍या नेत्यांना व जी. प. च्या बांधकाम विभागाला सोयरसुतक येथील वाहनधारकांचे दु:ख जानले म्हसवडच्या भोजलींग ट्रॅकसॅने आणि त्यांनी स्वखर्चाने या रस्ता चकाचक केल्याने भाविक व नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे. 

जांभूळणी ता. माण येथे  लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री भोजलींग देवस्थान आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविक व परिसरातील नागरिकांना पाणवण फाटा ते जांभूळणी गांव या दरम्यानचा चार किमी रस्ता पूर्णता उखडला गेला होता व रस्त्याच्या कडेला झाडे झुडपे वाढल्याने अनेक आपघात होत असल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला होता. अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत होती परंतू संबंधित विभागाने कामाला निधीची आडचण सांगितली जात होती. त्यामुळे हा रस्ता अनेक दिवसांपासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत होता. म्हसवड येथील भोजलींग ट्रॅकसॅच्या सदस्यांनी या रस्त्याची दुरुस्ती करुन रस्ता खड्डे मुक्त करुन, साईड पट्ट्या भरुन, रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे झुडपे स्वखर्चाने काढल्याने ग्रामस्थ व वाहनधारकांतुन समाधान व्यक्त केले जात आहे. 

      म्हसवड रिंगावण यात्रेनंतर दोन दिवसांनी जांभूळणीची सासणकाठ्या यात्रा भरते या यात्रेसाठी हजारोंच्या संख्येने गावकरी व भाविक यात्रेस उपस्थिती लावतात. यात्रे पूर्वीच म्हसवडच्या भोजलींग ट्रॅकसॅच्या सदस्यांनी स्वखर्चाने रस्ता दुरुस्त करुन सुरक्षित वाहतूक करण्यायोग्य रस्ता केल्याने ग्रामस्थांतुन व भाविकांतुन समाधान व्यक्त केले जात आहे. हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असून या रस्त्याकडे जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत हा रस्ता दुरुस्त करून देण्याचे अनेक बोलघेवड्या नेत्यांनी आश्वासने दिली होती परंतू निवडणुक काळात सवंग लोकप्रियता मिळवण्यापूरतीच आश्वासने होती का असा प्रश्न ग्रामस्थांन मधून विचारला जात आहे. 

       हा रस्ता दुरुस्ती साठी भोजलींग ट्रॅकसॅचे विजय सिन्हा, युवराज सुयॅवंशी, डॉ चेतन गलांडे, डॉ जितेंद्र तिवाटने, अजित सुयॅवंशी, राजकुमार सुयॅवंशी,श्रावण पडळकर, पिंटू पिसे, प्रदीप तावरे, माजी सैनिक बापू जावीर, संतोष प्रथमशेट्टी, सोमनाथ केवटे,विश्वजीत देशमुख,संजय भागवत, सचिन मंगरुळे, जाधव, चंद्रकांत जाधव ,शैलेश जंगम यांनी खर्चाने
मदत केली.

    या रस्त्याचे काम स्वखर्चाने सुरू असताना जि. पच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा फोन काम सुरु असताना आला तो अधिकारी म्हणाला कि तुम्ही कशाला रस्त्याची दुरुस्ती करता आम्ही केली असती की मग गेली अनेक वर्षे येथील नागरीक रस्ता दुरुस्तीची मागणी करत असताना बांधकाम खाते झोपले होते का असा प्रश्न ग्रामस्थांतातुन विचारला जात आहे. 

पूर्वी चा जांभूळणी रस्ता 

Post a Comment

0 Comments