Hot Posts

6/recent/ticker-posts

वडी येथे विविध विकासकामांचे उदघाटन, विकास कामांसाठी कटिबद्ध - आ. जयकुमार गोरे


पुसेसावळी ( वार्ताहर ):
माण - ख़टाव तालुक्याच्या विकास कामांना गती देण्याचे काम करित असून येणाऱ्या अडी-अडणीना धैर्याने तोंड देत ही विकासकामे मार्गी लावल्यात आली आहेत,


वडी ( ता- खटाव ) येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते, यावेळी वर्धन अॅग्रोचे चेअरमन श्री धैर्यशील कदम, जि. प. सदस्य श्री भीमराव पाटील,    जि. प. सदस्या सौ . सुनिताताई कदम , माजी.पं. स. सदस्य श्री.भरत जाधव आदी उपस्थित होते,


ते पुढे म्हणाले की वडी गावचे सरपंच अनिल सुर्यवंशी व सहकारी यांच्या मागणीवरून स्टॅड ते देवस्थान रस्ता, स्मशानभूमी रोड मुरुमिकरण, तालीम व व्यायामशाळा बंधारा व पूल ,अंतर्गत  डांबरीकरण, सभामंडप,अशी अनेक विकास कामे दिली, त्याच कामांचे उद्घाटन करताना दिलेला शब्द पाळला जातो यांची आठवण करुन दिली, त्यासाठी गावातील विकास कामासाठी गट- तट विसरून कामे मार्गी  लावून गावाचा सर्वागिण विकास साधणे गरजेचे आहे, 


यावेळी धैर्यशिल कदम, भीमराव पाटील , सचिन घाडगे आदींची भाषणे झाली, 


यावेळी गावात रोजगार हमी योजनेत झालेल्या कामांचे  म न रे गा चा सर्वाधिक निधी आणून कामे पूर्ण केल्याबद्दल सरपंच अनिल सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी वसंत यादव, प्रकाश मोहिते, सचिन जगदाळे, सुनिल येवले, दत्तात्रय येवले, किशोर येवले, अशोक यादव, अल्ताफ मुलाणी, गणेश कुंभार,


तसेच उपसरपंच ,सदस्य, व ग्रामस्थ युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते, प्रास्ताविक सरपंच अनिल सुर्यवंशी यांनी केले, आणि आभार सुरज येवले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments