Hot Posts

6/recent/ticker-posts

पुणे इन्व्हिटेशनल सुपरक्रॉस स्पर्धेत साताऱ्याच्या तनिका शानबागचे निर्विवाद वर्चस्व,सहभागी झालेली एकमेव महिला-स्पर्धक विजेतेपदासोबत जिंकली प्रेक्षकांची मने


सातारा: जेव्हा तिच्या वयाचे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेची तयारी करत आहेत, ती आपल्या १२५ सीसी मोटारसायकलवरूनमोटरक्रॉस शर्यतींमध्ये भाग घेऊन केवळ बक्षिसेच नाही तर प्रेक्षकांची मनेही जिंकत आहे. 'मोटरक्रॉस' या साहसी आणिकाहीसे पुरुषी वर्चस्व असणाऱ्या खेळामध्ये 'तनिका शानबाग' या नावाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.नुकत्याच पुण्यात झालेल्या 'पुणे इन्व्हिटेशनल सुपरक्रॉस' या स्पर्धेत तिने एसएक्स जुनिअर या विभागात आपले निर्विवादवर्चस्व सिध्द करून ११४ गुणांसह विजेतेपद मिळविले. या विभागात साताऱ्याच्याच श्लोक घोरपडे याने तिला तगडा सामनादिला मात्र, १०८ गुणांवर त्याला द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले.

'पुणे इन्व्हिटेशनल सुपरक्रॉस' या स्पर्धेच्या अनुभवाविषयी बोलताना तनिकाने सांगितले, स्पर्धेतील एकमेव महिला स्पर्धकअसले तरी त्याचे कोणतेही दडपण मला जाणवले नाही, किंबहुना या स्पर्धेत सहभागी होऊन मला आनंद झाला. यावर्षीच्यासुपरक्रॉस स्पर्धेचा ट्रॅक  आव्हानात्मक असल्याने मोटारसायकल चालवायला मजा आली.

या साहसी खेळाकडे वळण्याची भूमिका स्पष्ट करताना तनिकाने सांगितले, माझ्या लहान भावासोबत एकदा सरावासाठी गेलेअसताना मी सहज मोटारसायकल हाताळली आणि मला ट्रॅकवर मोटारसायकल चालवायला आवडली. मोटारसायकल सोबतहवेत भरारी घेरल्यानंतर माझी अपघातांविषयी वाटणारी भीती निघून गेली आणि या खेळाचे मला आकर्षण वाटू लागले.मागील एक वर्षापासून मी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. ज्यावेळी मीस्पर्धेसाठी मैदानावर माझी यामाहा वायझी १२५ सीसी मोटारसायकल घेऊन उतरते त्यावेळी ती स्पर्धा आणि खेळ हेचमाझ्यासाठी महत्वाचे असते. माझा सराव आणि अभ्यास, मला याच नियोजनामुळे संभाळणे शक्य होते.


या खेळाविषयी मुलींमध्ये फारशी उत्सुकता दिसत नाही याविषयी तनिकाने सांगितले, अनेकदा अपघातांच्या भीतीने मुली याखेळामध्ये सहभागी होण्याचे टाळतात. मात्र अपघातांची काळजी करण्याची गरज नाही, कारण अत्याधुनिक वैद्यकीयसेवांमुळे तुमची कोणतीही दुखापत लवकरात लवकर बरी होते. मैदानात उतरताना तुमच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजीघेतली जाते. जास्तीत जास्त मुली या खेळामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. केवळ एक महिला स्पर्धक म्हणून 'सुपरक्रॉस'स्पर्धांमध्ये  सहभागी होण्यापेक्षा, फक्त मुलींसाठीच आयोजित केल्या जाणाऱ्या 'सुपरक्रॉस' स्पर्धांमध्ये सहभागी व्हायलामला जास्त आवडेल.

Post a Comment

0 Comments