Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा वाढदिवस उत्साहात, पाटण तालुक्यात चर्चा सत्य सह्याद्रीच्या विशेषांकाची


पाटण/सत्य सह्याद्री वृत्तसेवा
पाटण तालुक्याचे भाग्यविधाते,माजी मंत्री, श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांचा ७४ वा वाढदिवस पाटण विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वाढदिनी सकाळी प्रभु श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर शिक्का मॅन्शन या निवास्थानी पाटणकर कुटूंबीयांनी औक्षण कले. यावेळी पुत्र युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर,याज्ञसेन पाटणकर, बंधू अमरसिंह पाटणकर यांच्यासह सर्व पाटणकर कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी विक्रमसिंह पाटणकर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने दूरध्वनीवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खा सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खा. उदयनराजे भोसले आ. आनंदराव पाटील, आ जयकुमार गोरे,  यांनी शुभेच्छा दिल्या.तर चाफळ येथील गौरव कार्यक्रमात  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सभापती रामराजे नाईक निंबाळकर,आ. शशिकांत शिंदे,आ. बाबासाहेब पाटील,आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले,आ.मकरंद पाटील,आ.दिपक चव्हाण,आ.नरेंद्र पाटील, प्रभाकर घार्गे, जि.प.चे अध्यक्ष संजीवराजे, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे,सारंग पाटील, राजेश पवार,मनोज पवार, रमेश पाटील, संगीता खबाले पाटील . संजय देसाई, रमेश मोरे, सभापती उज्ज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार, बबन कांबळे, नानासाहेब गुरव,श्रमजीवीचे बाळासाहेब कोळेकर, धैर्यशील पाटणकर,  दिनकर घाडगे, सुभाष पवार,कृष्णा शिंदे, रंगराव जाधव, वरेकर गुरूजी,संजय हिरवे, पाटण नगरपंचायत वतीने नगराध्यक्ष  सुषमा महाजन, दिपक शिंदे, सचिन कुंभार, उमेश टोळे, सागरमाने, अनिता देवकांत,मुख्याधिकारी करमळकर, कुमार वरेकर, कृष्णा सावंत,बोंद्रीचे सरपंच संजय भोळे,उपसरपंच  राजु पवार,  सदस्य सिताराम पवार, अर्चना कांबळे, योजना पवार,शेवंता यमकर,ग्रामसेवक प्रशांत माळी,दिपक साळुंखे, संतोष कांबळे, मंगलताई माने, काडोलीचे उपसरपंच संजय कांबळे, दिपक कांबळे, नंदकुमार कांबळे, रवींद्र सोनावले,मधुकर कदम, शंकर पवार यांनी तर दैनिक सत्यसह्याद्री च्या वतीने पाटण तालुका प्रतिनिधी संजय कांबळे यांनी वाढदिवस विशेषांक देऊन शुभेच्छा दिल्या तर पाटण पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष शंकरराव मोहिते, सचिव भगवंत लोहार,कार्याध्यक्ष बाबासो सुतार, महिला प्रतिनिधी विद्या म्हासुणेॅकर-नारकर,पाटण प्रमुख नितीन खैरमोडे,विक्रांत कांबळे,प्रशांत बेंद्रे, संजय कांबळे, सागर पाटील आदी पत्रकारांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी वाढदिवसाच्या निमित्ताने  दैनिक सत्यसह्याद्री ने प्रसिद्ध केलेल्या विशेषांकाचे प्रकाशन माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले,यावेळी सामाजिक कार्यकर्ते धैर्यशील पाटणकर, नगरसेवक सचिन कुंभार, पाटण अर्बन बँकेचे अध्यक्ष दिनकरराव घाडगे,सुभाषराव पवार,अमरसिंह पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान तालुक्यातील अनेक मान्यवरांनी सत्य सह्याद्री ने प्रकाशित केलेल्या विशेषांकाचे कौतुक केले. 




















पाटण तालुका पत्रकार संघाच्या वतीने  शुभेच्छा

पाटण तालुक्याचे भाग्यविधाते, राज्याचे माजी(सार्व.बांधकाम, पर्यटन) मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त पाटण तालुका पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
विक्रमसिंह पाटणकर यांच्या शिक्का मॅन्शन या निवासस्थानी बुधवारी पाटण तालुका पत्रकार संघाचे वतीने  अध्यक्ष शंकर मोहिते,सचिव भगवंत लोहार, कार्याध्यक्ष बाबासो सुतार, महिला प्रतिनिधी विद्या म्हासुणेॅकर-नारकर,पाटण प्रमुख नितीन खैरमोडे,विक्रांत कांबळे, प्रशांत बेंद्रे, संजय कांबळे, सागर पाटील आदी पत्रकारांशी  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments