पळशी (माण)/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
गेल्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ' विक्रीकर निरिक्षक ' या पदासाठी घेतलेल्या परिक्षेत पळशी , ता - माण येथील सौ. प्रियांका रविंद्र खाडे ( पंचभाई ) यांची या पदासाठी नुकतीच निवड झाली असुन पळशीच्या शिरपेचात त्यांनी अजुन एक मानाचा तुरा रोवला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच गाव म्हणून ओळखले जाणाऱ्यां माण तालुक्यातील पळशी गावच्या स्नुषा सौ. प्रियांका रविंद्र खाडे ( पंचभाई ) यांची गतवर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विक्रीकर निरिक्षक या पदासाठी घेतलेल्या परिक्षेत त्यांनी घवघवीत यश संपादन केले असुन दुष्काळाशी सामना करणाऱ्यां पळशीत शेकडो अधिकारी असुन त्यात अजुन त्यांच्या रूपाने भर पडली असून त्यांनी पळशीच्या शिरपेचात अजुन एक मानाचा तुरा रोवला आहे , त्या पळशी येथील बबन खाडे यांच्या स्नुषा व रविंद्र खाडे यांच्या पत्नी आहेत , त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे .

0 Comments