लोणंद - शिरवळ रस्त्यावरील मौजे शेडगेवाडी गावाच्या हद्दीत काल सायंकाळी ०६:४५ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने दुचाकी क्रमांक एम. एच ०६ /बी. एफ. /२२४४ या युनिकाॅर्न होंडा दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिली या मध्ये दुचाकी स्वार उमेश उत्तम येळे वय २३ वर्षे रा. सायमन कॉलनी, तुदाळ नेवेदार नावगाव जि. रायगड अलिबाग हा युवकाचा जाग्यावरच मृत्यू झाला.
धडक इतक्या जोराची होती कि मृत युवकाच्या डोके व तोंडाच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या होत्या.
संबंधित अपघाताची फिर्याद दत्तात्रय सुरेश बोराटे यांनी दिली असुन अपघात खबर कळताच तातडीने अपघात स्थळी धाव घेऊन लोणंद पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी पाहणी केली व अज्ञात वाहन व अज्ञात चालकाचा शोध सुरू केला असून या अपघाताचा तपास लोणंद पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे या करीत आहेत.
0 Comments