Hot Posts

6/recent/ticker-posts

कराडला पोलीस पाटील परीक्षा शांततेत


कराड/सत्य सह्याद्री वृत्तसेवा
कराड तालुक्यातील पोलीस पाटील भरती परीक्षा रविवारी सदगुरु गाडगे महाराज कॉलेजवर घेण्यात आली. तालुक्यातील रिक्त असलेल्या 65 गावांसाठी जाहीरनामा काढण्यात आला होता. त्यापैकी 28 जागांसाठी 60 उमेदवार परीक्षेस पात्र ठरले होते. त्यांची परीक्षा आज घेण्यात आली.

केंद्रप्रमुख तथा उपप्राचार्य एच. के. काळे यांच्या नियंत्रणाखाली परीक्षा सुरळीत पार पडली. सहाय्यक केंद्रप्रमुख म्हणून एच. व्ही. क्षीरसागर, पर्यवेक्षक जे. पी. काळे, आर. वाय. पाटील यांनी काम पाहिले. या परीक्षेसाठी एल. जी. जगदाळे, व्ही. बी. यादव, पी. डी. पाटील, व्ही. आर. शिंदे यांनी सहकार्य केले.
लेखी परीक्षेतून मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर जाहीर करण्यात येणार असून पात्र उमेदवारांच्या मुलाखती 26 डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृहावर घेण्यात येणार आहे. पोलीस पाटील परीक्षा भरती समितीचे अध्यक्ष प्रांताधिकारी हिम्मत खराडे व सचिव म्हणून तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी कामकाज पाहिले. 

Post a Comment

0 Comments