Hot Posts

6/recent/ticker-posts

कवठे गावच्या उपसरपंचपदी संदीप डेरे यांची निवड


वेळे/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा 
कवठे, ता.वाई येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पुरुस्कृत भैरवनाथ पँनेलचे संदिप विष्णू डेरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच पदाच्या निवडीसाठी आज विशेष सभा बोलविण्यात आली होती. यामध्ये संदिप डेरे यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सी. एस. तांबे यांनी डेरे यांना उपसरपंच घोषीत केले. यावेळी सदस्य गोरख चव्हाण, उजाता पोळ, शुभांगी कुंभार, रुपाली जगताप, रामदास ससाणे, बाळासाहेब मोरे हे उपस्थित होते. ग्रामपंचायत निवडणूकीत भैरवनाथ पँनेलने 11 जांगापैकी 7 जागांवर विजय मिळविला होता.
या बिनविरोध निवडीनंतर उपसरपंच संदिप डेरे यांनी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे तसेच ग्रामस्थांचे आभार मानून  कवठे ग्रामपंचायतीच्या परंपरेनुसार सर्वांना सोबत घेवून काम करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी कृष्णराव डेरे, मारुती पोळ, राहुल डेरे, माधवराव डेरे, दत्तात्रय पोळ, सुनंदा डेरे, मधुकर डेरे, आनंदा टिके, नितीन ससाणे, प्रविण पोळ, मानसिंग चव्हाण, दुर्योधन चव्हाण, संभाजी चव्हाण, बबन करपे, विजय पोळ, महेश डेरे, दिनकर डेरे, चंद्रकांत मोरे, राजाराम पोळ, आनंदराव कुंभार, प्रदिप डेरे, अमोल जाधव, बापू ससाणे, सुदेश डेरे आदी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
उपसरपंच निवडीबद्दल संदिप डेरे यांचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील, सभापती रजनी भोसले, उपसभापती अनिल जगताप, जिल्हा परिषद सदस्या संगिता मस्कर तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments