वेळे: वेळे येथील भिलारेवाडीच्या पाझर तलावात बुडून एक युवक बेपत्ता झाला आहे. आज सकाळी ही घटना घडली. सदरचा युवक हा कोपरखैरणे येथे राहात होता. तो भिलारेवाडी येथे पाहुणा म्हणून आला होता. प्रशांत प्रकाश नलवडे (वय 20) असे त्या युवकाचे नाव आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तो या तलावात अंघोळीसाठी गेला होता.पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. ही बातमी ग्रामस्थांना समजल्यानंतर सर्व ग्रामस्थ त्याचा शोध घेऊ लागले. परंतु तो सापडला नाही. म्हणून महाबळेश्वर येथील ट्रेकर्सना पाचारण करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे.सायंकाळी 6 वाजेपर्यंत त्यांनाही याचा मृतदेह मिळून आला नाही. सदरील घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून अधिकचा तपास पोलीस करीत आहेत
0 Comments