Hot Posts

6/recent/ticker-posts

गुंड सचिन ठाकूरचा खून करणारे चौघे जेरबंद, दगडाने ठेचून केला होता खून


फलटण/सत्य सह्याद्री वृत्तसेवा 
फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी येथे सचिन उर्फ शेट्या विश्वनाथ ठाकूर याचा संगनमताने डोक्यात दगड घालून निर्घृण पणे खून करण्यात आला होता या मधील संशयित आरोपी प्रकाश उर्फ फाक्या हिराचंद ओबासे वय २६ व सतीश उर्फ बंड्या रमेश सगर वय २१ ,प्रशांत उर्फ डिग्या भानुदास दिघे वय २६ वैभव व्यंकट नागझरकर वय २० सर्व रा.पुणे यांना म्हसवड एस टी स्थानकात सोलापूर - सातारा या एसटी मध्ये सापळा रचून पकडले असल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

या खुनातील संशयित आरोपी प्रकाश उर्फ फाक्या ओंबासे याच्या वडगाव ता.माण जि.सातारा येथील राहत्या घरी येणार असल्याची गोपनीय माहिती फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांना मिळाली त्याप्रमाणे पथकाला सूचना देऊन अटक करण्यास पाठवण्यात आले होते परंतु अचानक संशयित आरोपी यांनी प्लॅनमध्ये बदल केला व यांची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ओळखू नये या करिता डोक्यावरचे सर्व केस कापले होते, वेळोवेळी हुलकावणी पोलिसांना देत होते मात्र सदरचा गुन्हा लपवण्यासाठी पेहराव बदलून राहत होते मात्र फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान बुरसे यांनी व त्यांच्या ईतर सहकाऱ्यांनी म्हसवड एसटी स्थानक सापळा लावून सदर गुन्हयातील चार आरोपीना ताब्यात घेतले असून या वेळी त्या संशयित आरोपी यांचेकडे पोलीस यांनी कसून चौकशी केली असता हा खून भाईगिरीच्या वादातून पूर्वतयारीने केली असल्याची माहिती चौकशीत समोर येत आहे.

सदरची कारवाईत सहाय्यक पोलिस फौजदार सूर्यवंशी, पोलिस नाईक वाडकर, पोलिस नाईक तुपे,पोलिस नाईक भोसले,पोलिस शिपाई काळे यांनी कारवाईत प्रत्यक्ष भाग घेतला व या गुन्ह्यांची तपास कामी पोलिस उपनिरीक्षक आर.आर भोळ,सहाय्यक पोलिस फौजदार यादव,पोलिस हवालदार अतुल सोनटक्के ,पोलिस हवा. शिंदे,पोलिस शिपाई खराडे यांनी मदत केली असल्याची माहिती अशोक शेळके यांनी दिली आहे.
     

Post a Comment

0 Comments