वरकुटे म्हसवड / दिपक काटकर
माण तालुक्यातील अनेक तरुण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहेत.पुणे व दिल्लीत माण तालुक्यातील मोठी संख्या आहे.बुद्दीला जिद्द व चिकाटी ची जोड देऊन तालुक्यातील प्रतेक गाव अधिकाऱ्याचे गाव बनवा असे आवाहन माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी केले.ते दिवड ता.माण येथे लेफ्टनंट म्हणून निवड झालेल्या शुभम सावंत यांच्या नागरी सत्कार समारंभाच्या वेळी बोलत होते.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या सौ.भारती पोळ व सोनालीताई पोळ यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले की माण तालुक्यातील तरुणांना चांगले काम मिळावे ज्यांना विविध क्षेत्रात करिअर करायचंय त्याना विविध संधी उपलब्ध असून कष्ट,जिद्द,व चिकाटी ठेवली पाहिजे.माणदेश फौंडेशन च्या वतीने पुण्यात हा उपक्रम सध्या सुरू असून राहणे जेवण व मोफत मार्गदर्शन, राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचा तरुणांनी फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
देशमुख पुढे म्हणाले की शुभमने मिळविलेले यश हे कौतुकास्पद असून अतीशय कमी वयात मोठी कामगिरी केली आहे.एवढ्या कमी वयात एवढे यश संपादन करणे सोपी गोष्ट नाही.त्याला आई व वडिलांचे कष्ट व परिश्रम तर ज्ञात अज्ञात लोकांचे आशीर्वाद शुभमच्या पाठीमागे आहेत. शुभमने आणखी मोठी भरारी घ्यावी व मोठं होऊन गावचे,तालुक्याचे,आईवडील,शिक्षक व कुटूंबाचे नाव मोठं करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना लेफ्टनंट शुभम सावंत यांनी सांगितले की मला मिळालेल्या पदाचा उपयोग चांगला करीन व माझ्या आईवडील यांच्यासह माझे कुटूंब,दिवड,दिडवाघवाडी परिसर व माण तालुक्याला कधीच विसरणार नाही. साहेब,आपल्या तालुक्यातील तरुणांच्यासाठी कधी हाक मारा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू असे सांगितले.
या सत्कार समारंभासाठी माणचे सभापती रमेश पाटोळे, उपसभापती नितीन राजगे,डॉ.संदीप पोळ,मनोजकुमार पोळ, आय.ए.एस. विक्रम विरकर, प्रा. विश्वंभर बाबर, म्हसवडचे नगराध्यक्ष भगतसिंग विरकर, नगरसेवक गणेश रसाळ,माजी सभापती श्रीराम पाटील,दिवडचे सरपंच रामचंद्र सावंत,दिडवाघवाडीचे सरपंच बाळासाहेब काळे,अशोकशेठ सावंत.यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व दिवड परीसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.सत्कारापूर्व लेफ्टनंट शुभम सावंत यांची गावातून भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली.

0 Comments