Hot Posts

6/recent/ticker-posts

सातारा जिल्ह्यातील 5266 धर्मादाय संस्थांची नोंदणी रद्द



सातारा , दि. 17 (जिमाका):  महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे सुधारत  कलम 22 (3) नुसार कार्यरतनसलेल्या अकार्यक्षम  तसेच ट्रस्टचे उद्देश पूर्ण झालेले , ट्रस्टचे प्रयोजन बेकायदेशीर झालेने, मालमत्ता नष्ट केल्यामुळे  अथवा ट्रस्टच्याप्रयोजनाची पूर्ती करणे  अशक्य झालेले, ट्रस्टच्या हेतूपूर्तीसाठी  विश्वस्त कोणतेही कार्य करीत नसल्याचे आढळून आलेले तसेच विश्वस्तांनीगेल्या पाच वर्षाची हिशोबपत्रके किंवा फेरफार अर्ज सादरन केलेले अशा सर्व न्यासांची नोंदणी  करणेबाबत  विशेष  मोहिम धर्मादाय आयुक्त,महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे निर्देशानुसार सातारा कार्यालयामार्फत चालू करण्यात आलेली आहे. आज अखेर सुमारे 5266 हजार धर्मादायसंस्थांची नोंदणी           रद्द करण्यात आलेली असल्याची माहिती सहाय्यक धर्मादाय आयुक्त आय. के.  सुर्यवंशी यांनी दिली.   या कार्यालयांतआज अखेर सुमारे 16 हजार पेक्षा अधिक धर्मादाय संस्थांची नोंदणी  झालेली आहे. तथापि  त्यापैकी काही ठराविक संस्थाच उद्देशास अनुसरुन कार्यकरी असून वेळेवर हिशोब पत्रकेक तसेच बदल अर्ज सादर करीत आहेत. मात्र बहुतांशी संस्था केवळ कागदोपत्रीच अस्तित्वात असल्याचे व कायद्याच्या तरतूदीकडे दुर्लक्ष करुन कोणतीच कार्यवाही करीत नसल्याचे निदर्शनास आल्याने धर्मादाय संस्थाची चौकशी चालू असून अशा अकार्यरत व अकार्यक्षम संस्थावर कार्यवाही करण्यात आली आहेत. उर्वरीत अकार्यक्षम संस्थांची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही यापुढेही चालू राहणार असल्याची माहिती माहिती सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री. सुर्यवंशी यांनी दिली आहे.          

Post a Comment

0 Comments