कऱ्हाड/ रुपाली जाधव
बांगला मुक्ती संग्रामातील भारतीय दलाच्या विजया प्रित्यर्थ साजरा करण्यात येणाऱ्या दि.१६ डिसें.रोजी विजय दिवससमारोहाची चित्तथरारक कसरतींनी सांगता करण्यात आली.
विजय दिवस समारोह निमित्त दि.१५ डिसें.रोजी सकाळी कराड स्वच्छता दौड, रक्तदान शिबिर ,शस्त्रास्त्रे प्रदर्शन उदघाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे यशवंत जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. लेफ्टनंट पी.जर.एस. पन्नू यांना कऱ्हाड नगरपालिकेतर्फे मा. मुख्याधिकारी यशवंत डांगे व नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे यांच्या हस्ते विशेष मानपत्र देवून गौरविण्यात आले.पत्रकार किरण ठाकूर, पुण्याच्या दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे,क्रांतीवन निर्माते भाई संपतराव पवार, यांना विशेष मानपत्र, सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. कोल्हापूरच्या ज्या पतिच्या निधनाने गेली 30 वर्षे केशकर्तनालय चालवून घर चालवतात अशा शांताबाई यादव यांना आदर्श माता पुरस्कार तर कोल्हापूरच्याच श्रीमती शर्मिला तुपारे यांना वीरपत्नी म्हणून सन्मानित करण्यात आले.संत गाडगेबाबा महाविद्यालयाची विद्यार्थिनी ऐश्वर्या माने , सिद्धी जाधव ही होली फॅमिलीची विद्यार्थिनी यांना आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ,प्रशस्तीपत्र, गौरव चिन्ह असे होते. तर सिद्धी जाधव हिने आपल्याला पुरस्कारात मिळालेली रोख रक्कम पाच हजार वीरपत्नी शर्मिला तुपारे यांना सुपूर्द केले.
यावेळी सिक्कीम चे राज्यपाल श्री.श्रीनिवास पाटील, ब्रिगेडियर खरब,ब्रिगेडियर प्रवीण शिंदे,पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, कर्नल थॉमस,छ.शाहू महाराज,कोल्हापूर., तहसीलदार राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी यशवंत डांगे,त्रिशक्ती फौंडेशन चे सदस्य, विजय दिवस समारोह समितीचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
विजय दिवस समारोहचा मुख्य दिवस दि.१६डिसें.रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम वर चित्तथरारक कसरती , एम.एल.आय.बेळगाव जवानांचे लेझीम प्रात्यक्षिक, कऱ्हाड पोलीस प्रशासनाचे निर्भया पथक, शंभर हुन अधिक महिलांची पारंपरिक वेशभूषेत बाईक रॅली, होली फॅमिली कॉन्व्हेंट हायस्कुल बँडचे प्रात्यक्षिक, अरोमाडेलिंग(aromodeling) आणि पॅरागलायडिंग प्रात्यक्षिक यामध्ये पॅराशूट ची गगनभरारी लक्षवेधी होती.बबन कुंभार, तेजस गायकवाड आणि महेश पाटील यांचे मोटार सायकलचे धाडशी प्रात्यक्षिक, रिव्हर्स रिक्षाचे चालविण्याचे प्रात्यक्षिक, पुनावाला हायस्कूल चे मासपेटी व मानवी मनोरे,दोरीवरील उड्या व दांडपट्टा पेठवडगाव येथील विद्यार्थ्यांनी सादर केले.सी.एम.पी.आर्मी पथकाचे बँड प्रात्यक्षिक झाले.कऱ्हाड आणि परिसरातील हजारो नागरिक विजयदिवस समारोह कार्यक्रम पाहावयास उपस्थित होते

0 Comments