Hot Posts

6/recent/ticker-posts

फलटणमध्ये खाजगी सावकारकी प्रकरणात तिघा विरोधात गुन्हा दाखल


फलटण /सत्य सह्याद्री वृत्तसेवा 
होळ ता.फलटण येथील एकास व्याजाच्या पैशाच्या कारणावरून त्याच्या घरातील लोकांना दमदाटी व धमकी दिल्या प्रकरणी फलटण येथील तिघा व्यक्तीच्या विरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबत फलटण शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी दिलीप भीमराव भोसले वय 45 रा.होळ ता.फलटण यांना 1) रविंद्र अरविंद काकडे 2) आबा बापू काकडे 3) शामराव हिरामण जाधव सर्व रा.फलटण यांनी 12 लाख 50 हजार रुपये व्याजाने दिले होते. आज पर्यंत फिर्यादी दिलीप भीमराव भोसले यांनी 14 लाख 35 हजार दिलेले असताना एकूण रकमेपेक्षा 1 लाख 85 हजार देऊनही फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादी व त्यांची पत्नी व आई यांना पैशाची मागणी केली व फिर्यादीस मोबाईल वरून पैशाची मागणी करून धमकी दिली या प्रकरणी वरील तिघा संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दळवी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments