फलटण/विक्रम चोरमले
फलटण तालुक्यात 4 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूका आणि थेट सरपंच निवडी नुकत्याच पार पडल्या त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (राजेगट) 3 आणि राष्ट्रीय काँग्रेसने 1 ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व सिध्द केले असून नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
जाधवनगर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी राष्ट्रवादीचे (राजेगट) सतीश ज्ञानदेव जाधव हे 291 पैकी 156 मते घेवून विजयी झाले या ग्रामपंचायती मध्ये बहुमताने विजयी झालेले सदस्य सोनबा नाना जाधव, वैजयंता छगन जाधव, विद्या धनाजी कोरडे आणि बिनविरोध विजयी झालेेले सदस्य अक्षय बाळासाहेब रासकर, सुनिल मधुकर रासकर, अश्विनी किसन गोरे व मंदा दिपक जाधव हे चार बिनविरोध विजयी झाले असून सरपंचासह सर्व 7 ही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसला (राजेगट) माननारे आहेत.
उपळवे ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदी राष्ट्रवादीच्या (राजेगट) दिपाली धनाजी जगताप ह्या 847 पैकी 443 मते घेवून विजयी झाल्या तर या ग्रामपंचायतीत इंदूबाई हिंदूराव चव्हाण, प्रदिप विष्णुपंत लंभाते, सुनंदा मल्हारी जाधव, वनिता दादासाहेब गोफणे हे चार सदस्य राष्ट्रवादीचे आणि श्रीकांत श्रीमंत लंभाते, सुनिल पांडुरंग जगताप, रेखा दत्तात्रय लंभाते हे तीन सदस्य राष्ट्रीय काँग्रेसचे विजयी झाले असून या ग्रामपंचायतीत सरपंच व 4 सदस्य राष्ट्रवादी (राजेगट) आणि तीन सदस्य राष्ट्रीय काँग्रेसचे विजयी झाले आहेत.
सावंतवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी राष्ट्रवादीचे प्रदिप विठ्ठल सावंत 520 पैकी 263 मते घेवून विजयी झाले या ग्रामपंचायतीत सर्जेराव दादू जाधव, रेखा मारुती जाधव, विजयकुमार वामन जाधव, छाया शिवाजी जाधव, वनिता पुरुषोत्तम सावंत हे पाच सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि रमेश निवृत्ती घनवट, सविता भाऊसाहेब फडतरे हे दोन सदस्य राष्ट्रीय काँग्रेसचे विजयी झाले आहेत या ग्रामपंचायतीत सरपंचपदासह 5 जागा राष्ट्रवादीने आणि दोन जागा राष्ट्रीय काँग्रेसने जिंकल्या आहेत.
दर्याचीवाडी ग्रामपंचायत सरपंचपद राष्ट्रीय काँग्रेसच्या गितांजली भिमराव कुमकले यांनी 455 पैकी 141 मते घेवून तर सुनिता पोपट पवार (बिनविरोध), रुपेश दादा शिंदे, साधना आप्पा ढेंबरे, रंजना शिवाजी ढेंबरे या चार जागा राष्ट्रीय काँग्रेसने तर काकासाहेब आबाजी जाधव हे राष्ट्रवादीचे एकमेव उमेदवार विजयी झाले असून दोन जागा रिक्त राहिल्या आहेत.
दर्याचीवाडी ग्रामपंचायत थेट सरपंचपदासह 5 पैकी 4 जागा जिंकून राष्ट्रीय काँग्रेसने या ग्रामपंचायतीवर आपले निर्विवाद वर्चस्व सिध्द केले असून उपळवे येथे 3 आणि सावंतवाडी येथे 2 सदस्य राष्ट्रीय काँग्रेसचे विजयी झाले आहेत नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे युवा नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने (राजेगट) 4 पैकी 3 ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व सिध्द केल्यानंतर महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी सरपंच व सदस्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

0 Comments