भाटकी- सार्वजनिक बांधकाम खात्याच्या भाटकी-गाडेकर वस्ती दरम्यानच्या रस्त्यावर जेसीबीने बांध घालुन अतिक्रम करुन बंद केलेला रस्ता.
अतिक्रमण करताना सीमेंट कॉंक्रीटीकरण कामाची माहिती दर्शवणारा फलक जेसीबीने काढुन टाकुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा प्रकार
कॉंक्रिटीकरणाचा उर्वरित रस्ता
म्हसवड/ धनंजय पानसांडे
भाटकी ते गाडेकरवस्ती दरम्यानच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यावर येथीलच धनदांडग्या शेतक-याने जेसीबीच्या साह्याने बांध घालुन अतिक्रमण करुन रस्त्यावर ताबा मिळविल्याने हा रस्ता तब्बल तीन महिन्यापासुन बंद आहे परिणामी ग्रामस्थांना रस्त्याअभावी दरी-खो-यातुन सुमारे पाच किलोमिटर पायीच पायपिट करावी लागावी लागत आहे.
हा रस्ता अतिक्रमण मुक्त करुन तो पुर्ववत वाहतुकीस खुला करावा याबाबत संबंधित ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक,माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व पंचायत समितीचे उपसभापती, सार्वजनिक बांधकाम खात्याचे दहिवडी कार्यालयाचे उपअभियंता,माणचे तहसिलदार व खटाव - माणचे प्रांताधिकारी व म्हसवड पोलिस ठाणे इत्यादींना गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत वेळोवेळी समक्ष भेटुन व लेखी निवेदने देऊनही हा रस्ता अद्यापही अतिक्रमण मुक्त होऊ शकला नाही.यामुळे संबंधित अतिक्रमण धारकाचे प्रशासकीय पातळीवर किती राजकीय पातळीवर दबदबा आहे याची प्रचिती निश्चितच येते.
याबाबत भाटकी येथील दत्तु मजाप्पा काळेल, बाळु किसन काळेल,दादा पोपट काळेल,ज्ञानदेव महादेव काळेल इत्यादी तरुणांनी ग्रामस्थांच्या मदतीने हा रस्ता अतिक्रमण मुक्त करुन तो पुर्ववत वाहतुकीस खुला करावा या बाबत शासन पातळीवर सर्व स्तरावर पाठपुरावा केला परंतु त्यांना अद्यापही यश आले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
रस्ता अतिक्रम बाबत माहिती देताना दत्तु काळेल म्हणाले की, भाटकी ते गाडेकर वस्तीचा हा रस्ता फार वर्षापुर्वी पासुनचा आहे.व तो सार्वजनिक बांधकाम खात्याने विकसित केलेला आहे.या रस्त्याचा काही भागाचे डांबरीकरण त्यानंतर राहिलेल्या रस्त्याचे ग्रामपंचायतीने बाराव्या वित्त आयोगातुन उपलब्ध झालेल्या निधीतुन सिमेंट कॉंक्रीटीकरण केले व उर्वरित रस्त्याचे खडी व मुरमीकरण करण्यात आले होते.२० नोव्हेंबरला या रस्त्यालगत शेती असलेल्या शेतक-याने जेसीबीच्या साह्याने सुमारे दिडशे मिटर रस्त्यावरच माती- मुरमाचा बांध घातला व रस्ता बंद केला. यावेळी हा रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरण कोणत्या निधीतुन करण्यात आला या ची माहिती लिहिलेला लावलेला लोखंडी अँगलमधील पत्र्याचा बोर्ड काढुन दुर फेकुन दिला.रस्त्यावरील अतिक्रमण बाबतची याबाबतची पहली लेखा तक्रार २७ नोव्हेंबर व त्यानंतर ११ ऑक्टोंबरलाही दुसरे निवेदन ग्रामस्थांनी दिले होते. या निवेदनानंतर २७ ऑक्टोंबरला ग्रामपंचायतीने गामसभा घेऊन या रस्त्यावरील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात काढुन टाकण्याचा ठराव करुन या सभेत उपस्थित असलेले ग्रामसेवकास तातडीने करण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या
परंतु काहीच कारवाई केली गेली नाही. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खाते गटविकास अधिकारी, तहसिलदार यांनाही आम्ही ग्रामस्थांनी समक्ष भेटुन निवेदने बारंवार दिलेली आहेत वरिष्ठांनी ग्रामसेकास तोंडी व लेखी आदेश देऊनही ग्रामसेवक संबंधित अतिक्रमण धारकाच्या भितीने कारवाई करीत नाहीत असे निदर्शनास येत आहे. शासकीय कामात कुचराई करणे ,सार्वजनिक व शासकीय मालमत्तेचे नुकसानकामी अप्रत्यक्षपणे मदत,रस्यावरील अतिक्रमण काढुन टाकणे ग्रामसभेचा ठराव व वरिष्ठांच्या आदेशास केराची टोपली दाखविण्याचा प्रकार करुन कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी संबंधित ग्रामसेवकास निलंबित करुन त्यांचेवर फौजदारी कारवाई करावी या मागणीसाठी तहसिल कार्यालयासमोर आम्ही ग्रामस्थांसमवेत आमोरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा श्री.दत्तु काळेल, बाळु काळेल, दादा काळेल,ज्ञानदेव कांबळे आदींनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.



0 Comments