Hot Posts

6/recent/ticker-posts

म्हसवड नगरपालिकेच्या विषय समितीच्या सभापतीच्या निवडी जाहिर

वरकुटे-म्हसवड / सत्य सह्याद्री वृत्तसेवा
आज म्हसवड नगरपालिका सभागृहात झालेल्या विषयी समितीच्या निवडी माणच्या तहसिलदार सौ सुरेखा माने यांच्या अध्यक्षतेखाली तर नगराध्यक्ष भगतसिंग विरकर उपाध्यक्षा स्नेहल सुर्यवंशी व मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या उपस्थितीत पलिकेच्या विषय समितीच्या निवडी करण्यात आल्या त्यामध्ये तीन पदे जैसे थे तर तीन नगरसेवकांना नव्याने सभापतीची संधी देण्यात आली. 

म्हसवड पालिकेत परिवर्तन पॅनेलची सत्ता स्थापन होऊन एक वर्ष आकरा दिवस पुर्ण झाले. सत्ता स्थापन झाल्यानंतर पालिकेतील विषय समितीच्या व उपनगराध्यक्ष निवडी  करण्यात आल्या होत्या त्याची मुदत संपल्यामुळे मा.जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशान्वये म्हसवड पालिकेच्या पदाधिकारी यांनी गेल्या आठवड्यात एक गुप्त ठिकाणी बैठक घेवून नव्या निवडी विषयी चर्चा केली.

यावेळी गत वेळी ज्यांना संधी मिळाली नव्हती त्या नगरसेवकांनी आम्हाला संधी मिळावी असी मागणी केली. त्यामुळे या बैठकीत निवडी झाल्या नाहीत. मंगळवारी पुन्हा एकदा बैठक घेण्यात आली. यावेळी स्वच्छता सभापती सौ हिंदमालादेवी राजेमाने, नियोजन सभापती गणेश रसाळ व शिक्षण सभापती शहाजी लोखंडे यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिला व आम्हाला कोणतेच पद नको म्हणत मनाचा मोठे पणा दाखवला माञ पाणी पुरवठा,महिला व बालकल्याण व उपनगराध्यक्ष या पदाच्या राजीनाम्या बाबत निर्णय होऊ शकला नसल्याने हि पदे जैसे थे ठेवण्यात आली व नविन तीन सभापतीच्या निवडी करण्यात आल्या.
यामध्ये पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापती पदी सौ सविता राहूल म्हेत्रे यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी  सौ हिंदमालादेवी राजेमाने, शहाजी लोखंडे, तेजस्वीनी सोनवणे, विकास गोंजारी यांची  निवड झाली,

उपाध्यक्षा स्नेहल सुर्यवंशी यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदी पुुन्हा निवड करण्यात आली तर सदस्यपदी सौ कलाबाई पुकळे, सौ हिंदमालादेवी राजेमाने, तेजस्वीनी सोनवणे यांची निवड झाली. शिक्षण समितीच्या सभापती पदी सौ सविता अनिल माने यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी धनाजी माने, शहाजी लोखंडे, डॉ वसंत मासाळ, सौ शोभा लोखंडे यांची निवड झाली.स्वच्छता विषयक वैद्यकिय आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापती पदी दिपक ब्रम्हदेव बनगर यांची निवड करण्यात आली. तर सदस्यपदी गणेश रसाळ, कलावती पुकळे,रणजित येवगे,सौ साळूबाई कोळेकर यांची निवड झाली.

नियोजन व विकास समितीच्या सभापती पदी केशव आप्पा कारंडे यांची निवड करण्यात आली तर सदस्य पदी गणेश रसाळ, धनाजी माने, अकिल काझी, सौ मनिषा विरकर यांची निवड करण्यात आली.
स्थायी समितीच्या सभापती पदी पदसिध्द अध्यक्ष तुषार उर्फ भगतसिंग पांडूरंग विरकर यांची तर सदस्यपदी विविध समित्याचे सभापती  सौ सविता म्हेत्रे, सौ स्नेहल सुर्यवंशी, सौ सविता माने, दिपक बनगर, व केशव कारंडे यांची निवड करण्यात आली.

या निवडी गट नेते धनाजी माने यांनी जाहीर केल्या.यावेळी युवराज सुर्यवंशी पृथ्वीराज राजेमाने, अनिल माने,राहुल म्हेञे,सुरेश पुकळे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments