वडूज@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
गावातील एक शेतकरी गावात नसताना एका ठेकेदाराला हाताशी धरून त्याच्या शेतातील गौणखनिज चोरी करण्याचा आरोप असलेला खटाव पंचायत समितीचा माजी सदस्य विनोद पंडित (रा. चितळी, ता. खटाव) याला वडूजचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी 1 वर्ष सक्तमजुरी तसेच 40 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यामुळे खटाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून पंडित हे जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांचे समर्थक आहेत.
याबाबत माहिती अशी, 2011 साली खटाव तालुक्यातील चितळी येथील चितळी-चिखलहोळ रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात येत होते. या कामाचा ठेका अशोक नामदेव बोराटे यांच्याकडे होता. त्यावेळी विनोद पंडित हा खटाव पंचायत समिती चा सदस्य होता. त्यावेळी पंडित व बोराटे तसेच कामगाराने संगनमताने चितळी येथील शेतकरी भगवान नारायण पवार यांच्या गट नं. 881 या शेतातील शेततळ्याजवळील सुमारे 700 ते 800 ट्रॉल्या मुरूम व सुमारे ÷÷100 ते 150 ट्रॉल्या दगड चोरून नेऊन रस्त्याच्या कामाकरिता वापरला होता. यामुळे भगवान पवार यांचे 1 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले होते. पवार हे चेन्नई येथे असताना हा प्रकार घडला होता. चितळी येथे आल्यानंतर त्यांनी याबाबत वडूज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.
या खटल्याची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी झाटे यांच्या न्यायालयात झाली. नमूद खटल्याते अभियोग/सरकार पक्षातर्फे अभिजित अशोक गोपलकर, सहा. सहकारी अभियोक्ता यांनी साक्षीदार तपासले व आरोपीस कडक व जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी युक्तीवाद केला होता. सदर खटल्यातील साक्षीपुरावा, सरकारी अभियोक्त्यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून व समाजात सद्यस्थितीत मुरुम चोरीबरोबर नदीपात्रातील वाळूची राजरोसपणे चोरी केली जाते. त्याचा समाजावर व निसर्गावर विपरीत पिरणाम होतो हीबाब गंभीर स्वरुपाची असून अशा प्रकारामध्ये सौम्य शिक्षा देता येणार नाही, असे मत वडूज न्यायालयाने नोंदवून आरोपीस दोषी मानून सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
अभियोग पक्षास पोलीस प्रॉसिक्युशन स्कॉडचे तौसिफ शेख, सहा. पोलीस फौजदार श्री. शिवाजीराव पायमल, सहा. पोलीस फौजदार प्रदीप गोसावी, पोे. हवालदार सुधीर मोहिते यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment