बैलबाजारमार्गे कोल्हापूर नाका रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करू ‘बळीराजा’चे कराड नगराध्यक्षांना निवेदन - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, January 15, 2018

बैलबाजारमार्गे कोल्हापूर नाका रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करू ‘बळीराजा’चे कराड नगराध्यक्षांना निवेदन



कराड@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
बैलबाजार मार्गावरून कोल्हापूर नाक्याकडे जाणार्‍या रस्त्याची अत्यंत दूरवस्था झाली असून हा रस्ता दुरुस्त केला नाही तर या खड्ड्यात बळीराजा शेतकरी संघटना वृक्षारोपण करेल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला.
मुल्ला यांच्यासह कराड दक्षिण युवा बळीराजा संघटनेचे सागर कांबळे, युवा तालुकाध्यक्ष विक्रम थोरात, कराड तालुकाध्यक्ष उत्तमराव खबाले, कराड उत्तर युवा अध्यक्ष विजय वीर, बळीराजा लादे व कार्यकर्त्यांनी सोमवारी कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, बैलबाजार मार्गे स्व. पी. डी. पाटील उद्यानासमोरून कोल्हापूर नाक्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्याकडे कायम दुलंक्ष होत आहे. कारण, या रस्त्यावरून कोणतेही मंत्री, मुख्यमंत्री जात नाहीत. तेथे आमचा शेतकरी शेती उत्पादीत माल, जनावरे, बैल घेऊन बाजार येत असतो. त्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाहीत.
तेथील रस्त्यावरून स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींना सामेरे जावे लागत आहे व स्थानिक वयस्कर लोक, महिला व लाहन मुले स्व. पी. डी. पाटील उद्यानात व्यायामला अथवा खेळण्यासाठी येत असतात. त्या रस्त्यावर असणार्‍या खड्ड्यामुळे तेथे अनेक अपघात झालेले आहेत. त्यामुळे या निवेदनाची तात्काळ दखल घ्यावी. 

No comments:

Post a Comment