सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनाचा वारसा पुढे नेला पाहिजे -डॉ नितीन सावंत - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, January 15, 2018

सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनाचा वारसा पुढे नेला पाहिजे -डॉ नितीन सावंत


लोणंद@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
 "साहित्यिक निर्माण करण्यासाठी ग्रामीण भागात तशी व्यासपीठे जाणिवेने तयार केली पाहिजेत. विवेकानंदांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहचवले पाहिजेत,संस्कार हे महत्वाचे असतात त्यामुळेच माणूस जेंटलमन बनतो त्यासाठी वैचारिक पातळी वाढवली पाहिजे आणि सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनाचा वैचारिक वारसा पुढे नेला पाहिजे" असे मत महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. नितीन सावंत यांनी व्यक्त केले. येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयाचा मराठी विभाग व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर आयोजित केलेल्या राष्ट्रीय काव्यवाचन व कथाकथन स्पर्धेच्या उदघाटन समारंभात बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ टी एन घोलप  होते. 
माणसाच्या व्यक्तिमत्वाविषयी बोलताना पुढे ते म्हणाले की बोलणं आणि संस्काराचे महत्व जीवनात खूप आहे ,एक चांगली पिढी घडेल आणि ती मोठी होऊन आम्हाला गुरुदक्षिणा देईल ती म्हणजे स्वतःचा सर्वांगीण विकास करेल ,जिजाऊ मासाहेबांनी सह्याद्रीच्या मातीत एक चांगला पुत्र घडवला तसेच जिज्ञासू राहूनआपण त्यांच्या विचारांचे आचरण केले पाहिजे ,असेही ते म्हणाले 
नगरसेवक हणमंत शेळके पाटील म्हणाले की जे क्षेत्र आपण निवडू तेथे आत्मविश्वासाने काम केले पाहिजे 
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रा सुहास निर्मळे म्हणाले की आज महाविद्यालयिन शिक्षणात कला शाखेस तुच्छ लेखले जाते पण कला शाखा हा सर्व व्यावसायिकतेचा पाया आहे 
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य टी एन घोलप म्हणाले की कलेची जोपासना केली पाहिजे त्यामुळे आनंद मिळतो

राष्ट्रीय मराठी काव्यवाचन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला त्यात  प्रथम क्रमांक हौसेराव सर्जेराव हुबाले देशभक्त आनंदराव बळवंतराव  नाईक कॉलेज चिखली,द्वितीय क्रमांक   दिनकर विष्णू खाडे बी एस्सी ऍग्री , डी वाय पाटील कृषी महाविद्यालय तलसंदेव तृतीय क्रमांक पूजा विलासपवारFYBAबाळासाहेब देसाई कॉलेज पाटण यानी मिळविलात्यांनाअनुक्रमे 4000,3000,व 2000 रुपयांचे पारितोषिक ,सन्मानचिन्ह ,व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले ,काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षण कवी संतोष पद्माकर पवार ,अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर, व प्रा डॉ आबासाहेब उमाप ,कला वाणिज्य महाविद्यालय पुसेगाव यांनी केले

राष्ट्रीय मराठी कथाकथनस्पर्धेचा निकाल जाहीर झाला त्यात 
प्रथम क्रमांक हौसेराव सर्जेराव हुबाळे बी ए 3 देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक कॉलेज चिखली याच विद्यार्थ्याने मिळविला 
द्वितीय क्रमांक 
सुजित श्रीमंत काळगे बी ए 2
छ शिवाजी कॉलेज सातारा 
व तृतीय क्रमांक
उमेश राजेंद्र गोसावी 
मुधोजी कॉलेज फलटण यांनी मिळविला त्यांना अनुक्रमे 4000,3000,व 2000 रुपयांची पारितोषिके सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले स्पर्धेचे परीक्षण प्रा रवींद्र कोकरे कथाकथनकार ,मा विलास वरे ,कथालेखक यांनी केले ,पारितोषिक वितरण समारंभात परिक्षकांच्या हस्ते,व प्रा डी ए पाटील यांचे हस्ते पारितोषिके देण्यात आली तसेच मराठी भाषा संवर्धन पंधरावड्या निमित्त अंजली रासकर व विद्यार्थ्यांनी  अक्षरबन भित्तीपत्रिकेचे संपादन केले व भित्तीपत्रिकेचे प्रकाशन कवी  संतोष पवार यांनी केले ,या स्पर्धांचे समन्वयक म्हणून मराठी विभाग प्रमुख प्रा सुभाष वाघमारे यांनी प्रास्ताविक केले व सह समन्वयक प्रा सुखदेव कोल्हे यांनी आभार  मानले
पत्रकार रमेश धायगुडे ,शशिकांत जाधव या पत्रकारांचा या वेळी सत्कार करण्यात आला  माजी विद्यार्थी पोपट धायगुडे, गजेंद्र मुसळे, कय्युमभाई मुल्ला यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला , .प्रा एम डी नायकू यांनी सूत्रसंचालन केले ,
10 फेब्रुवारी शिविम अधिवेशन बळवंत कॉलेज विटा येथे होईल तेथील उदघाटन समारंभात  संबंधित विजेत्या विद्यार्थ्यांना ग्रंथ स्वरूपात पारितोषिके देऊन शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ कोल्हापूर या संघातर्फे गौरव करण्यात येणार आहे

No comments:

Post a Comment