वावरहिरे घाटात दुचाकीस्वारास लुटले - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, January 15, 2018

वावरहिरे घाटात दुचाकीस्वारास लुटले


गोंदवले @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
दहिवडी शिंगणापूर रस्त्यावर वावरहिरे घाटात अज्ञात चोरट्यानी दुचाकी गाडी अडवून पस्तीस हजार रोख आणि अन्य अशी पासष्ठ हजाराच्या ऐवजाची लूट केली या बाबत दहिवडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे
महेश नंदकुमार खाडे रा पळशी ता माण हे आणि त्यांचे चुलत बंधू हे काही माल खरेदी करण्यासाठी नातेपुते ता माळशिरस येते गेले होते तिथून रात्री 9:45 वाजता माघारी येताना वावरहिरे येते आले असता घाटाच्या दुसऱ्या वळणावर मागून शिंगणापूर बाजूकडून येणाऱ्या दोन स्प्लेडर दुचाकी वरील काळी जॅकेट आणि तोंडाला रूमाल बांधलेले चार जण लाकडी दांडके घेऊन येत आमची गाडी अडवली व आम्हाला मारहाण करत आमच्या कडील रोख 35 हजार रुपये आणि 20 हजार रुपयांचा माल आणि सोन्याची अंगठी असा 65 हजारांचा ऐवज चोरून नेहाला या बाबतची फिर्याद महेश खाडे यांनी दहिवडी पोलिसांत दिली असून अधिक तपास हवालदार राऊत करत आहेत

No comments:

Post a Comment