फलटण@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल व मराठा समाजाला उद्देशून जातीवाचक व अर्वाच्य भाषेत एक युवक शिवीगाळ करीत असल्याची तक्रार व निवेदन मराठा समाजाच्या वतीने फलटण शहर पोलिस ठाण्यात देण्यात आले असून संबंधित युवकाचा शोध घेऊन त्याचेवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की सध्या एक युवक सोशल मीडियावर व्हीडिओ रेकॉर्ड करून छत्रपती शिवाजी महाराज यांच अवमान करून मराठा समाजाला जातीवाचक शिवीगाळ करून सामाजिक तेढ करून जातीय दंगली घडवण्याचा युवकावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात यावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
या युवकाने स्वतः चा व्हीडिओ तयार करून त्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व मराठा समाजाला शिवीगाळ करीत असून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करीत आहे या मुळे सामाजिक ऐक्य धोक्यात येऊन बदनामी करीत असल्याचे त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे.
सदर युवकामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण झाला आहे. त्या मुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या मुळे वेळीच या युवकाचा शोध घेऊन त्याचेवर कडक कारवाई करण्यात यावी व अशा दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment