मासाहेब जिजाऊप्रमाणे आज मुलांवर संस्कार करणाऱ्या मातांची गरज : शुभांगी शिंदे - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, January 15, 2018

मासाहेब जिजाऊप्रमाणे आज मुलांवर संस्कार करणाऱ्या मातांची गरज : शुभांगी शिंदे


फलटण@  सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
तरडगांव येथे सौ.वेणूताई चव्हाण हायस्कुल तरडगांव व ग्रामपंचायत तरडगांव  यांचे संयुक्त विद्यमाने मासाहेब जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी शुभांगी शिंदे यांचे मी जिजाऊ बोलतेय या एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले. शुभांगी शिंदे यांनी मासाहेब जिजाऊ यांचा जीवनपट  प्रत्यक्ष समोर उभा करून अंगावर शहारे आणणारे अनेक प्रसंग आपल्या कसदार अभिनयातून सादर केले या प्रयोगातून त्यांनी उपस्थितांना मासाहेब जिजाऊप्रमाणे आज मुलांवर संस्कार करणाऱ्या मातांची गरज आहे असे सांगीतले या कार्यक्रमासाठी सन्माननीय  सरपंच, उपसरपंच,  सर्व सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व महीला वर्ग मुख्याध्यापक श्री.पाटील सर सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यालयातील सर्व विद्यार्धी विद्यार्थिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment