Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी लोणंद फाऊंडेशनचा आदर्श घेतील - रविंद्र कोकरे


लोणंद @ सत्य  सह्याद्री न्यूज नेटवर्क 
लोणंद फाऊंडेशन वतीने  घेतलेल्या लोणंद गौरव पुरस्कार,सी सी टी व्ही लोकार्पण सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा  सत्कार हा कार्यक्रम लोणंद नगरपंचायत पटांगण  येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. 

  यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यकरमास सुरुवात करण्यात आली यावेळी कुस्ती सम्राट पैलवान आस्लम काझी,  पुणे सेवाकर उपायुक्त राहुल चंद्रकांत खरात, वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र शेळक- पाटील, पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सपोनि सोमनाथ लांडे, नगराध्यक्षा स्नेहलता शेळके पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके पाटील, डॉ नितिन सावंत,ज्येष्ठ पत्रकार शंकराव जाधव, के रामचंद्र राव, नगरसेवक योगेश क्षीरसागर, हणमंतराव शेळके पाटील ,शैलजा खरात, साजिद मुल्ला, रविंद्र क्षीरसागर, विनोद दादा क्षीरसागर सचिन शेळके, सुभाष घाडगे मिठुभाई पटेल,राजेंद्र कुरेशी,शिवाजीराव शेळके पाटील, देवकी काकू डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

  पुढे बोलताना ते म्हणाले की लोणंद फाऊंडेशनचे काम समाजाला प्रेरणा देणारे असून लोणंद फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे  येथे सी सी टी व्ही चा राबवलेला उपक्रम विधायक आहे यानंतर प्रमुख मान्यवरांनी आपआपले मनोगत व्यकत केले लोणंद यावेळी राहुल  खरात यांच्या हस्ते रिमोटचे बटन दाबून सी सी टी व्ही  लोकार्पण सोहळा पार पडला नंतर सयाजी तिरमके यांना पैलवान  असलम काझी यांचे हस्ते लोणंद गौरव पुरस्कार देऊन भूषविण्यात आले राहुल खरात व इतर मान्यवरांच्या हस्ते  गुणवंत विद्यार्थाचा व विविध क्षेत्रातील निपुण नागरिकांचा सत्कार करण्यात आला यावेळी लोणंद गौरव पुरस्कार देऊन भुषविण्यात आलेले सयाजी तिरमके यांनी पुरस्कारास उत्तर देताना म्हटले की पालकांनी आपल्या मुलांना क्रिडा क्षेत्रात त्यांची आवडीचे क्षेत्र निवडण्याची संधी दयावी मुलांना त्यांचा कल त्याच्या आयुष्याची दिशा ठरवेल. 

    यावेळी लोणंद फाऊंडेशनचे अध्यक्ष दयानंद खरात,कय्युम मुल्ला, रमेश धायगुडे, सागर शेळके, अॅड. विलायतभाई मणेर, सुनिल शहा, राजशेखर खरात, डॉ.स्वाती शहा, दिपिका घोडके, डॉ.किशोर बुटियाणी, डॉ गणेश दाणी, डॉ. जयश्री यादव, भावेश दोशी, महंमद कच्छी, ममता अरोरा, हेमंत आप्पा पवार, सुनिल शेळके, संतोष खरात, दिपक बाटे, हेमंतआप्पा पवार, स्वप्नील दगडे,  रणदिश धायगुडे, उमेश बोडरे, नौशाद शेख उपस्थित होते.
सुत्रसंचलन गजेंद्र मुसळे यांनी केले तर आभार सुनील शेळके सर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी लोणंद व पंचक्रोशीतील सर्व क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments