फलटण@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण तालुका माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी राहुल बोबडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. फलटण तालुका कार्यकारणी निवड करण्यासाठी शनिवार दि.13 रोजी मुधोजी हायस्कूल फलटण येथे तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी अध्यक्षस्थानी अविनाश जगताप होते.
तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष राहुल बोबडे (आदर्की माध्यमिक विद्यालय आदर्की), उपाध्यक्ष सौ.स्वाती माने (श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल मलठण -फलटण), उपाध्यक्ष शिवाजी कोळपे (मालोजीराजे शेती विद्यालय फलटण), उपाध्यक्ष राजेन्द्र भागवत (हिंगणगाव माध्यमिक विद्यालय), सचिव विठ्ठल साळवे (श्री. संत ज्ञानेश्वर विद्यालय नांदल ), संघटक दताञय भोसले (मठाचीवाडी विद्यालय), कोषाध्यक्ष बापूराव जगतात (वडले माध्यमिक विद्यालय), सदस्य पुढील प्रमाणे लक्ष्मण भारमळ (मुधोजी हायस्कूल फलटण), गजानन फडतरे (श्री. सरस्वती माध्यमिक विद्यालय बिबी), मल्हारी कोळेकर (होळ माध्यमिक विद्यालय), विजय जगतात (महात्मा फुले विद्यालय सासवड), किशोर मांढरे , (वाजेगाव माध्यमिक विद्यालय), सचिन जमदाडे (मुधोजी हायस्कूल फलटण) यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सातारा तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष मनोहर महाडीक उपस्थित होते. यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल माने, सहकार्यवाहक रमेश इंगवले, उपाध्यक्ष जगदीश भोसले, फलटण तालुका माजी अध्यक्ष तावरे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे सुञसंचालन बाळासाहेब ननावरे यांनी तर आभार बापूराव जगतात यांनी मानले.
No comments:
Post a Comment