चेतना सिन्हा यांची लीडरशीपची भुमिका महत्वाची-मिसेस सीएम - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, January 14, 2018

चेतना सिन्हा यांची लीडरशीपची भुमिका महत्वाची-मिसेस सीएम


मुंबई@ धनंजय पानसांडे 
ग्रामीण भागात महिलांना व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन त्यांनी बनविलेल्या विविध वस्तु विक्रीसाठीही शहरी भागात 'माणदेशी महोत्सव' आयोजन करुन वस्तु विक्रीसाठी प्लेटफार्म माणदेशी फौंडेशनच्या माध्यमाने महिलांना मिळु शकला यामध्ये श्रीमती चेतना सिन्हा यांची लीडरशीपची भुमिका महत्वाचीच आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या पत्नी अमृता फडणविस यांनी केले.
म्हसवड येथील माणदेशी फौंडेशनच्या वतीने मुंबई येथील रविंद्र नाट्य मंदीराच्या आवारात भरविलेल्या  माणदेशी महोत्सवात सहभागी झालेल्या ग्रामीण भागातील माणदेशी नवउद्योजिकांचा सौ.फडणविस यांचे हस्ते प्रमाणपत्र, मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या किशोरी राणे,मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर हेमांगी बडेकर,विक्रम चौगुले, चेतना सिन्हा इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती.

सौ.फडणविस पुढे म्हणाल्या, शहरात वेगवान सुविधांचा फरक असतो. ग्रामीण भागातील गावामधील सामाजिक व इतर अडचणीवर मात करीत महिला माणदेशी महोत्सवाच्या माध्यमाने शहरी भाग्य पोहण्याची तुम्ही भरारी घेतलीत.या महोत्सवातील महिलांनी बनविलेल्या वस्तुची सर्व स्ॉल्स पाहिल्यावर नामांकित कंपनीपेक्षा तुमच्या वस्तु उत्तम कॉलिटीच्याच असल्याचे दिसुन आले आहे.७० टक्के लोक गावाकडे राहतात असे असतानाही शहरी महिलांच्या बरोबरीने ग्रामीण भागातीलही महिला मोबाईल अँप्सचा वापर अचुकपणे कसे कपतात हे या महोत्सवात मी स्वत: प्रत्यक्ष अनुभवले.विशेष बाब ग्रामीण भागातील महिला उद्योजिकांना शुन्य टक्के व्याज दराने शंभर कोटी रुपये उपलब्ध करुन देण्याच्या विचारात राज्य सरकार आहे.भविष्यात माणदेशी महिला बँकेच्या माध्यमाने महिला उद्योजिकांना याचा लाभ तुम्हास होऊ शकेल असे सौ.फडणविस यांनी नमुद केले.

माणदेशी नवउद्योजिका लक्ष्मी लोखंडे,कल्पना माळवे,ए.बी.जाधव,राधाबाई जाधव,मनीषा धुपडे,अंजना पिसे व रुपाली शिंदे इत्यादींचा सौ.फडणविस यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

प्रास्ताविक करताना चेतना सिन्हा म्हणाल्या की,माणदेशी फौंडेशन पाच राज्यात महिला आर्थिक सक्षिमीकरणाचे कार्य करीत आहे. दुष्काळजन्य स्थितीत जनावरांची छावणी व चारा पुरवठा,सिमेंट बंधारे बांधकामे, महिलांसाठी मोबाईल व्यावसाय प्रशिक्षण सुविधा,मुलांना क्रिडा प्रशिक्षण, उपक्रमांचा समावेश आहे. माणदेशी महोत्सवाच्या माध्यमाने ग्रामीण भागातील शेतक-यांचा उत्पादित माल विक्रीस मध्ये व्यापारी न येता तो थेट शहरी भागातील ग्राहकांना खरेदी करता यावा या हेतुने माणदेशी महोत्सवाचे आयोजन केले जात असुन याचा शेक-यांना फायदा होऊ लागला आहे.

जागतीक स्तरावरील वर्ड इकोनॉमिक फोरम मध्येही आशिया खंडातील देशामध्ये प्रथमच भारतातील पहिली महिला म्हणुनही मला प्रतिनिधित्व मिळाले असुन त्यामध्येही महिलांच्या उन्नतीसाठी शंभर कोटी रुपयाचा निधी मंजुर केला जाणार असल्याचेही श्रीमती सिन्हा यांनी सांगितले
यावेळी सौ.फडणविस यांच्या हस्ते माणदेशी महिला बँकेचे मोबाईल एटीएम व माणदेशी फौंडेशन संचलीत जनावरांची छावणी पुस्तकिचे अनावरण करण्यात आले. 
माणदेशी लोकरीचे जेन त्यांना भेट देण्यात आले.
कार्यक्रमात माणदेशी नवउद्योजिकांनी व्यवसायातील यशोगाथा कथित केली.
या कार्यक्रमास माणदेशी फौंडेशनचे सर्व विश्वस्त,माणदेशी महिला बँकेच्या संचालीका,व हितचिंतक मुख्यकार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी,वनिता शिंदे.
माणदेशी चँपियनचे प्रमुख प्रभात सिन्हा, विजय सिन्हा ,याबरोबरच सर्व स्टॉल घारक महिला उग़द्योजिका उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी अमृता फडणविस यांचेसह इतर मान्यवरांनी महोत्सवामधील सर्व ९० स्टॉलची पाहणी करीत संबंधित स्टॉल चालीका उद्योजिकांशी संवादही साधला.
पारंपारिक मातीची भांडी तयार करीत असलेल्या कुंभाराच्या फिरत्या चाकावर मातीचे भाडे तयार करण्यातही त्या मग्न झाल्या.

छायाचित्र
माणदेशी महोत्सवात माणदेशी उद्योजिकांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करताना अमृता फडणविस, किशोरी राणे,हेमांगी बडेकर,विक्रम चौगुले, चेतना सिन्हा आदी.

No comments:

Post a Comment