फलटण@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
काल दि.13 रोजी सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिघल यांनी अवैध वाळू उपसा व अवैध वाळू वाहतूक प्रकरणी सर्व उपविभागीय अधिकारी यांची तत्काळ बेठक घेतली व जिल्ह्यात चालू असलेल्या वाळू वाहतूक प्रकरणी धडक कारवाई करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाने महसूल विभाग यांनी वाळू विरोधात मोहीम उघडत कारवाई सुरू केली आदेशानुसार बेसुमार वाळू उपश्यामुळे खडबडून जागे झालेल्या महसूल विभागाने दालवडी ता.फलटण येथील बाणगंगा नदी शेजारील खाजगी शेतातून अवैध वाळू काढलेल्या ठिकाणी पाहणी करून त्या ठिकाणी अवैध वाळू उपशाप्रकरणी पंचनामा करण्यात आला या मध्ये अंदाजे 34 लाख रुपये संबंधित वाळू उपसा झाला असल्याची माहिती फलटण तहसीलदार विजय पाटील यांनी दिली आहे. सत्य सह्याद्री ने याबाबत वृत्त प्रसारित केले होते, या वृत्ताची दखल थेट जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली.
या बाबत अधिक माहिती की मौजे दालवडी ता.फलटण येथील बाणगंगा नदीच्या पात्राशेजारील असणाऱ्या खाजगी शेत जमिनीतून वाळू उपसली होती या मध्ये गायकवाड वस्ती जवळील दोन ठिकाणी गट नं. 84 चे मालक महादेव शंकर गायकवाड, सदाशिव शंकर गायकवाड, विश्वास शंकर गायकवाड, सचिन तात्याबा गायकवाड यांच्या क्षेत्रातील अवैध व अनधिकृत उत्खनन केल्या प्रकरणी या गट नं. 84 मधून वाहने नेऊन बापूराव प्रकाश लोखंडे रा.ढवळ यांनी अनधिकृत उत्खनन करून वाळू साठा केला असल्याची माहिती मंडलाधिकारी अभिजित सोनवणे यांनी पंचनाम्यात नमूद केली आहे व या बाबत त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी असलेल्या वाळूची मोजमाप करून अंदाजे 34 लाख रुपये रकमेचा वाळू उपसा झाला असल्याची माहिती फलटण तहसीलदार विजय पाटील यांनी दिली असून या पुढे अशाच कारवाई सुरू राहतील असे तहसीलदार विजय पाटील यांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment