चाफळ@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील माजगांव , चाफळ , जाधववाडी तसेच कराड तालुक्यातील खालकरवाडी चरेगाव या गावच्या शिवरामध्ये बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे.
माजगाव शिवारातील एका शेळीपालन शेडला या बिबट्याने लक्ष केले आहे. दिनांक 15 रोजी रात्री या बिबट्यांनी दोन शेळ्यांना भक्ष्य केले व दोन कुत्रे ही गायब झाल्याचे समोर येत आहे.
काही गावकरी यांनाही बिबट्याने दर्शन दिल्याने गावकऱ्यांच्यातही शेतात जाण्यावरून उलट सुलट चर्चा सुरु आहे. आतापर्यंत बिबट्याने 8 शेळ्या व असंख्य कुत्रे मारली आहेत.एका शेतकऱ्याच्या ट्रॅक्टर या वाहनाला बिबट्या आडवा गेला यावेळी त्या शेतकऱ्याने वाहनांची गती वाढवून बिबट्याला घाबरवून पळवून लावण्याच्या उद्देशाने त्याच्याकडे दिशा केली असता बिबट्या ट्रॅक्टर च्या दिशेनेच येऊ लागला तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता ट्रॅक्टर चालकाने तेथून पळ काढला. या सर्व प्रकारामुळे महिला व शेतकरी यांच्यात प्रचंड घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे
No comments:
Post a Comment