फलटण @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते फलटण नगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 व 11 च्या आरोग्य तक्रार निवारण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर सांगितले की पुढील काळात नगर पालिकेचे पाच कोटीहुन अधिक उत्पन्न वाढणार असल्यामुळे नागरिकांच्या मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी त्या पैशाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे फलटण नगर पालिकेची कामे दर्जेदार पध्दतीने होण्यासाठी ठेका पध्दतीने करायला देणार असून यासाठी याक्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना यांचा ठेका देणार आहे. फलटण शहर हे माझ्यासाठी कुटूंब आहे फलटण शहरासाठी विकासासाठी आम्ही कमी पडणार नाही. स्वच्छता अभियान हे तात्पुरते मर्यादित न ठेवता असेच पुढे चालू ठेवायचे आहे. यामुळे स्वछतेचे महत्व पटवून स्वच्छ व सुंदर फलटण होण्यासाठी सर्वानी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.निताताई मिलिंद नेवसे, बांधकाम सभापती किशोरसिंह नाईक निंबाळकर, आरोग्य सभापती सौ.वैशालीताई अहिवळे, शिक्षण सभापती सौ.प्रगतीताई कापसे, सौ.सुवर्णा अमरसिंह खानविलकर,सौ. मधुबाला भोसले, सौ. वैशालीताई चोरमले, सौ.ज्योत्स्ना शिरतोडे, मिलींद नेवसे, दादासाहेब चोरमले, सुधीर अहिवळे, रणजित भोसले, तेजसिह भोसले, राहुल निंबाळकर, अनिल शिरतोडे, किशोर तारळकर, फलटण पालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.
0 Comments