मायणी@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांमध्ये आज शासन अमुलाग्र बदल
करु पाहत आहे. समाजातुन या शासनांच्या सकारात्मक गोष्टिवर किव्हा विचारावर
आज समाधान निर्मान झाले असलेतरी शासनाच्या या योजना समाजाने पुढाकार घेऊन
पुर्ण कराव्या हे विचार मायणी येथिल सचिन हजारे यांनी " गुरुवे
नम:"लघुपटाव्दारे मांडल्या आहेत.
होळीचागाव
, ता. खटाव या ठिकाणी' गुरुवे नमः'या लघुपटाचे चित्रिकरण करण्यात आले
आहे.या लघुपटाची निर्मिती व लेखन सचिन आनंदा हजारे रा .मायणी ता .खटाव
यांनी केले आहे.गुरुवे नमः या लघुपटामध्ये स्वच्छतेचे महत्व, शौचालायाचा
योग्य वापर, शिक्षणाचे महत्व, शिक्षक करत असणाऱ्या सामाजिक कामामध्ये
समाजाने पुढाकार घेऊन अनेक कामे मार्गी लावायला हवी, व्यसनमुक्ती,
प्रदूषणमुक्ती, तरुण पिढीला योग्य मार्गाने जाण्याचा संदेश इ. गोष्टींवर
प्रकाश टाकलेला आहे.
यू
टुब या सोशल मिडीयावर या लघुपटाचे प्रमोशन झाले आहे. मागील चार
दिवसांपासुन हा लघुपटास हजारो लोकांनी पाहिला आहे.व या लघुपटाविषयी आपल्या
भावना ही व्यक्त केल्या आहेत.सचिन हजारे हे माध्यमिक शिक्षक आहेत.गेली १२
वर्षे शिरसवडी येथिल एका खाजगी संस्थेमध्ये सेवा करीत आहेत. त्यांचा हा
पहिल्याच लघुपट आहे .त्याचे लेखन व दिग्दर्शन स्वत: केले आहे.
त्यांच्या
या लघुपटाचे चित्रण यश डिझीटल व मिक्सिंग हाऊसचे मयुर शेंडे यांनी केले
आहे.यालघुपटासाठी संतोष मोहिते, युवराज घार्गे, संजय कचरे, सोमनाथ
कांबळे, सचिन जगताप, राजू मोहिते व होळीचागावच्या ग्रामस्थ व तरुण मुलांनी
प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे.
या
लघुपट निर्मितीसाठी भाऊसाहेबजी लादे, अविनाश शिंदे , प्रदीप महामुनीं,
विजय माने, बाबासाहेब कुंभार,प्रमोद चौधरी,विशाल कांबळे ,संतोष धुमाळ व
होळीचागावच्या ग्रामस्थांनी सहकार्य केले.
चौकट
:-स्वत:विचार व लेखन समाजासमोर मांडण्याची इच्छा होती.पण अर्थिक परिस्थिती
मुळे अडचनी येत होत्या.केलेले लिखान अनेक दिग्दर्शकांकडे पोहचविणे शक्य
नसल्यामुळे या लघुपटाव्दारे कमी खर्चात चित्रीकरण होऊ शकते.त्यामुळे मी हा
लघुपट तयार केला आहे.आणि लवकरच चित्रपट दिग्दर्शक होण्याचा मानस आहे.--
सचिन हजारे. लघुपट निर्माते व सदस्य- फेलोमेंबर स्र्किन रायटर असोशिएशन.
0 Comments