Hot Posts

6/recent/ticker-posts

भूमिगत विद्युत वाहिनीचा भूमिपूजन समारंभ म्हणजे दुसऱ्याच्या पोराला आपले नाव देण्याचा प्रकार- समशेरसिंह नाईक निंबाळकर


फलटण@ सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क
नगर पालिकेने घेतलेला भारत सरकार पुरस्कृत एकात्मिक ऊर्जा विकास योजना (IPDS) अंतर्गत शहरी विद्युत व्यवस्थेतील १३.४७ किलोमीटर विद्युत वाहिनी भूमिगत विद्युत वाहीनीचा भूमिपूजन समारंभ म्हणजे दुसऱ्याच्या पोराला आपले नाव देण्याचा प्रकार असल्याचे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सदरची योजना ही एच टी लाईनची आहेत त्यांचा घरगुती वीज लाईनशी काही संबंध नाही, शहरात दिसणाऱ्या वीज वापराच्या तारा आहेत तश्याच राहणार आहेत. दुसरी बाजू म्हणजे १३२ केव्ही कोळकी उपकेंद्र ते पृथ्वी चौक, पृथ्वी चौक ते नारळी बाग, दत्त मंदिर ते गोसावी वस्ती, गोसावी वस्ती ते जिंती नाका १३.४७ किलोमीटर कसे भरले हे समजत नाही संबंधितांनी जनतेसमोर मोजमापाचा खुलासा करावा म्हणजे मोजमाप कोणत्या पध्दतीने करण्यात आले व १३.४७ किलोमीटर अंतर कसे भरले हे जनतेस समजेल. कोणत्याही कामाचा गाजावाजा करून फक्त स्रेय घेण्याचा प्रकार सत्ताधारी करत आहेत. त्या समारोहाचा नगर पालिकेचा काडीमात्र संबध नसल्याचे विरोधी पक्ष नेते समशेरसिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.
याचबरोबर फलटण शहरात सुरू असणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये बराच घोटाळा असून, रंगाच्या टेंडरमध्ये सावळा गोंधळ झाल्याचे समशेरसिंह यांनी यावेळी सांगितले. या व्यतिरिक्त नगरपरिषदेचा अगामी अर्थसंकल्प मंजुर करण्यासाठी लवकरच विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे, या सभेत मनमानी पद्धतीने पाणीपट्टीत वाढ, सांस्कृतिक भवनच्या भाड्यात वाढ करण्याचा घाट सत्ताधा-र्यांनी घातला असल्याचा आरोपही यावेळी समशेरसिंह यांनी केला. जर दरवाढीचा निर्णय बहुमताने घेण्यात आला तर नागरीकांची आर्थिक कोंडी होणार असुन त्यास मी माझे सहकारी कडाडून विरोध करु असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ठेक्यामध्ये मागील सभेमध्ये झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी देखील अजून झालेली नाही. तसेच अतिरिक्त कर्मचारी आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यात येईल असे मुख्याधिकारी यांनी सांगितले होते त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. कर्मचा-यांच्या विरोधात तक्रारी वाढत आहेत परंतु सत्ताधारी त्याकडे लक्ष देत नाहीत असे यावेळी त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments