विक्रम चोरमले फलटण@ सत्य सहयाद्री न्यूज नेटवर्क
फलटण नगर पालिकेच्या निवडणुकीस नुकतेच एक वर्ष पुर्ण झाले. फलटण नगर पालिकेत नगराध्यक्षा सह विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाव्यादा फलटण नगर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली पण एक वर्षातच पक्षातंर्गत वादामुळे व नगराध्यक्षाच्या नवरोबाच्या नगरपालिकेतील घरोबामुळे गटातील काही नगरसेवकांसह नगर पालिकेतील कर्मचारी वैतागले आहेत. मागील काही काळात हस्तक्षेपचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून नगर पालिकेत एकूण कर्मचारी यांची असणारी संख्या व कामाचा व्याप पाहता कर्मचारी यांच्याशी वागणे फारच चुकीचे आहे. मुळात नगराध्यक्ष कोण? हा प्रश्न नगर पालिका कर्मचारी याच्यापुढे सतत पडतो. कर्मचारी यांना सतत समक्ष बोलवून अथवा फोनवर बोलवून पतीराजाकडून आदेश दिला जातो आणि आदेश देताना फारच चुकीची वागणूक कर्मचारी यांना दिली जाते. ज्या पक्षाच्या अध्यक्ष यांनी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत 50 टक्के आरक्षण देऊन महिला सक्षमीकरणाचे पाऊल उचलले त्याचं पक्षाच्या थेट जनतेमधून नगराध्यक्ष पदासाठी निवडून आलेल्या या फक्त नावापुरत्या राहील्या आहेत का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
दिनांक 23 रोजी भारत सरकार पुरस्कृत एकात्मिक ऊर्जा विकास योजना (IPDS) अंतर्गत शहरी विद्युत व्यवस्थेतील १३.४७ किलोमीटर विद्युत वाहिनी भूमिगत करण्याच्या कामाचे भूमिपूजन समारंभ महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते गडसोली मैदान फलटण लगत येथे संपन्न झाला त्या वेळी उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे व काही नगरसेवक यांची अनुपस्थित होती ही सर्वासाठी नवीन नव्हती कारण या आगोदर अनेक कार्यक्रमास उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे अनुपस्थिती ही नित्याची झाली आहे. त्यांची कारणे ही तशीच आहेत. प्रमुख कारण म्हणजे नगराध्यक्ष (म्हणजे त्याच्यापतीचा) यांचा एककल्ली व मनमानी कारभार. जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्या त्या वेळी एखादा कार्यक्रम आयोजित करून गटतटातील राजकारण केले जात आहे.आता हेच राजकारण गटातटात व्यतिरिक्त सर्वांच्या बाबतीतही होत असून अनेक जण यामुळे त्रस्त झाले आहेत. याचबरोबर जिथं जिथं संधी मिळेल तिथे मान अपमानाचे राजकारण होत असून नगर पालिकेत मिळालेल्या सत्तेचे सोने करण्याचे सोडून चमकोगिरीवर जास्त भर दिला जात आहे. ज्या व्यक्तीन उभं आयुष्य राजकारणातुन समृद्धी व विकास कसा करता येईल यासाठी घालवली अनेक विकासाची कामे सत्यात उतरवली त्यांच्यापुढे ही चमकोगिरी काय कामाची. नगर पालिकेत यापूर्वीच्या काळात कामाचा अनुभव असणाऱ्या व सध्या सत्तेत असणाऱ्या गटातील ईतर नगरसेवकाना बरोबर घेऊन फलटणच्या विकासासाठी एक विचार करण्याची आवश्यकता असताना सत्ताधारी गटातच राजकारण होताना दिसत आहे. एकक्कली, सतत राजकीय विचार याच चुकीच्या विचार सरणीमुळे फलटणच्या विकासास खीळ बसत आहे.
पुढील काळात नगर पालिकेच्या तिजोरीत विविध मार्गाने रक्कम जमा होणार आहे. यातून पुढील चार वर्षात फलटणच्या विकासासाठी कामे करण्याची फार मोठी संधी सत्ताधारी यांना मिळणार आहे. सध्या राज्यात सत्ता नसतानाही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने अनेक मोठी विकासाची कामे होणार असून या संधीचे सोने करण्याऐवजी गटतटाचे राजकारण व मानाआपमान यासाठी वेळ वाया घालवणे योग्य नाही. फलटणच्या नागरिकांनी फक्त विकासाच्या मुद्यावर सत्ताधारी यांना सत्ता दिली आहे. सत्ताधारी नगरसेवकानी नागरिकांचा विश्वासघात करू नये. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटणच्या जनतेस नगर पालिका निवडणूकीच्या वेळी अनेक विकासाची कामे करण्याची वचने दिली आहेत त्या वाचनाच्या पुर्ततेस खोडा घालण्याचा प्रयत्न पक्षातील लोकांनी करू नये. नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्याच्या बाबत व विकासाच्याबाबत निर्णय घेताना राजकारण केलं जात असल्याची बाब अनेकांकडून बोलवून दाखवली जात आहे. सत्ताधारी नगरसेवकामध्ये प्रभागातील कामे होत नसल्याने नाराजी असून ही नाराजी प्रभागातील नागरिकाच्यासमोरही बोलून दाखवली जात आहे.
महाराष्ट्र शासनाने मध्यतरी महिला नगरसेवक व नगराध्यक्षा यांच्या पतीदेवच्या व नातेवाईकाच्या नगर पालिका कारभारात वाढता हस्तक्षेप पाहता सूचना काढली होती त्यानुसार प्रशासकीय कामात पतीदेवाचा व नतेवाईकाच्या नगर पालिकेतील वाढत्या हस्तक्षेपास आळा घालण्याबाबत सूचना दिल्या होत्या परंतु अशा सूचना व आदेशाकडे मुख्याधिकारील कानाडोळा न करता आहेत. मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या दालनात बसून रोजच्या कामामध्ये अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप होताना दिसूनही त्याकडे मुख्याधिकारी यांनी दुर्लक्ष करणे ही बाब चुकीची आहे. इतकेच नाही तर लोकप्रतिनिधींच्या हक्कावर गदा आणणारी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा वापर केवळ रबरस्टँपसारखा होणे खेदजनकबाब आहे.
मागील काही महिन्यात फलटण शहरातील विकासाच्या व विविध प्रकारच्या योजनांच्याबाबत ज्या ज्या वेळेस पक्ष बेठकीचे आयोजन करण्यात आले त्या त्या वेळेस विकासाच्या प्रश्नापेक्षा आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या जास्त झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या पक्ष बेठकीत हीच बाब प्रत्यशाने समोर आली परंतु याबाबत निर्णय लांबणीवर ठेवण्यात आला असून पुढील पक्ष बेठकीत याबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी नगरसेवक गटाने केली आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की जो पर्यंत पक्ष श्रेष्टी याबाबत ठोस निर्णय घेत नाहीत आणि जो पर्यंत सत्ताधारी विचाराने एकत्र येत नाहीत तो पर्यत फलटणच्या विकासाला गती मिळणार नाही हे निश्चित.
सत्ताधारी गटात या आगोदरही गटातटाचे राजकारण होत होते ही बाब काही नवीन नाही परंतु या मागे पक्षातीलच कोण व्यक्ती आहेत ज्यांनी हा खेळ मांडला आहे याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. भांडणे लावून मजा बघणा-याना त्यांची योग्य जागा दाखवण्याची वेळ आली आहे अन्यथा अशा व्यक्तीच्या रचलेल्या राजकारणाच्या खेळात विकासाची गती खुंटणारच यात शंका नाही !
0 Comments